कुर्ल्यात धर्मांध मुस्लिम मुलांची गुंडगिरी! फिनिक्स मॉलजवळ तरुण-तरुणीला मारहाण

    21-Nov-2026   

Kurla Assault Case
 
मुंबई (Kurla Assault Case) : कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलजवळील प्रमोद महाजन उद्यानात एका तरुण आणि तरुणीला धर्मांध मुस्लिम अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यात हल्लेखोर तरुण-तरुणीला काठ्या आणि दगडांनी मारहाण करताना दिसत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, उद्यानात असलेल्या तरुण-तरुणी आणि अल्पवयीन मुलांमध्ये शाब्दिक वाद होताना दिसत आहे. मात्र, काही वेळातच या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. टोळक्यातील एक मुलगा काठीने तर दुसरा त्याच्या चेहऱ्यावर ठोसा मारताना दिसतो आहे. यावेळी तरुणी मध्ये पडून आपल्या मित्राला वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसते.(Kurla Assault Case)
 
तरुणाने घटनेचे चित्रीकरण करण्यासाठी मोबाईल बाहेर काढल्यानंतर टोळक्यातील सर्वजण मिळून तरुण-तरुणीला मारहाण करू लागले. त्यापैकी एकाने मोठा दगड उचलून त्या दोघांच्या दिशेने भिरकावल्याने परिस्थिती हाताबाहेत जात होती. या घटनेनंतर समाजमाध्यमांवर मुंबई पोलीस आणि घाटकोपर पोलिसांना उद्देशून कारवाईची मागणी करणारी तक्रार प्रसारित करण्यात आली. संबंधित मुलांची ओळख पटवावी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
 
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिनिक्स मॉलजवळील महापालिकेच्या उद्यानात छायाचित्रे काढत असताना आठ अल्पवयीन मुलांनी तरुण आणि तरुणीला मारहाण केली. स्थानिकांनी या घटनेचे चित्रीकरण केले असून, त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे घाटकोपर पोलिसांनी संबंधित आठ विधिसंघर्षग्रस्त बालकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १८९(४), ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करून पुढील कठोर कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले.(Kurla Assault Case)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर