
मुंबई - Shraddha Kapoor Eetha shakti kapoor अभिनेता शक्ती कपूर यांनी आपली लेक श्रद्धा कपूर आणि तिच्या आगामी ‘ईथा’ या चित्रपटाबद्दल प्रचंड अभिमान व्यक्त केला आहे. या भूमिकेला जिवंत करण्यासाठी श्रद्धाने घेतलेली मेहनत, तिचं समर्पण आणि तिची जिद्द यांचं त्यांनी भरभरून कौतुक केलं. चित्रपटाबद्दल बोलताना शक्ती कपूर म्हणाले की, आयुष्यात अनेक ताणतणाव येतच असतात; पण जेव्हा मनावर दडपण असतं, तेव्हा ते डोळे मिटून देवाचा धावा करतात आणि मनोमन इच्छा व्यक्त करतात की, काश! अशा वेळी मला फक्त ‘ईथा’ पाहता यावा.
श्रद्धाने या भूमिकेसाठी घेतलेल्या शारीरिक कष्टांबद्दल सांगताना त्यांनी एक खास गोष्टही उघड केली. सततच्या मेहनतीमुळे श्रद्धाचे पाय अक्षरशः सुजून जायचे. आपल्या पत्नीप्रमाणेच महाराष्ट्रीयन व्यक्तिरेखा साकारताना श्रद्धाने या चित्रपटासाठी तन-मन-धन नव्हे, तर अक्षरशः आपला जीव ओतला आहे. लेक म्हणजे देवाचंच दुसरं रूप असल्याचं सांगत शक्ती कपूर पुढे म्हणाले की, श्रद्धा फार कमी चित्रपट करते; पण जेव्हा एखादा प्रोजेक्ट हातात घेते, तेव्हा त्यासाठी पूर्ण समर्पण, अफाट मेहनत आणि मनापासून प्रेम देऊन काम करते.Shraddha Kapoor Eetha shakti kapoor
श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘ईथा’बद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, पहिलं गाणं ‘जी जी रे जी’नेही रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लावणीचा ठसका, तिच्यातील ताकद आणि नजाकत यांचा सुंदर मिलाफ या गाण्यात पाहायला मिळत असून, त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.Shraddha Kapoor Eetha shakti kapoor
मॅडॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन्स यांची निर्मिती असलेला ‘ईथा’ येत्या ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.Shraddha Kapoor Eetha shakti kapoor