मुंबई, (Mumbai Book Festival 2026 Sessions): मुंबई पुस्तक महोत्सवात साहित्य, इतिहास, संस्कृती, संविधान आणि वाचनसंस्कृती अशा विविध विषयांवर विचारमंथनाची पर्वणी मिळणार आहे दि. २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवात पुस्तक प्रकाशनासह विविध विषयांवरील चर्चासत्रे, व्याख्याने आणि बहुभाषिक काव्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या सत्रांमध्ये साहित्यप्रेमींना विविध विषयांचा आस्वाद घेता येणार आहे.
२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता 'चित्रपती व्ही. शांताराम’ या पुस्तकावर चर्चा होणार असून, यात डॉ. शेख मोहम्मद शकील इम्तियाज गोरखपुरी सहभागी होणार आहेत. त्यानंतर ‘थिरुक्कुरल विदाऊट फ्रंटियर्स : अॅन्शियंट तमिळ विज्डम फॉर अ शेअर्ड ह्युमन फ्युचर’ या विषयावर डॉ. रामनाथन श्रीनिवासन यांचे सत्र होणार आहे. दुपारी १ वाजता ‘शांती के लिए पुकार’ या एनबीटी प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. पृथ्वीराज तौर आणि सुनील कुलकर्णी यांची उपस्थिती यावेळी राहणार आहे. दुपारी २ वाजता ‘अत्म दीप भवः : एक प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन व परिसंवाद होणार असून, आकाश अंभोरे सहभागी होणार आहेत. त्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज : द लायन ऑफ द डेक्कन’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.(Mumbai Book Festival 2026 Sessions)
सायंकाळी ४ वाजता ‘५१ मॉन्युमेंट्स ऑफ इंडिया’ या पुस्तकावर परिसंवाद होणार असून, यशवंत पिटकर, यज्ञेश्वर पाठक आणि प्राजक्ता पाई सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५ वाजता ‘विश्वगुरू आशिष चौहान आणि एनएसई : राष्ट्रव्यापी विश्वासाची उभारणी’ या पुस्तकावर परिसंवाद होणार आहे. डॉ. मयूर शाह हे या सत्रात सहभागी होणार आहेत.
२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ‘दहावी नापास’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. किशन पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर वाचनसंस्कृती रुजवण्यात ग्रंथपालांची भूमिका या विषयावर चर्चा होईल. दुपारी १ वाजता ‘प्राचीन कन्नड वाङ्मय’ या विषयावर कृष्णमूर्ती हनूर यांचे सत्र होणार आहे. दुपारी २ वाजता ‘भारतीय संविधान आणि आपण’ या विषयावर विजय वेदपाठक यांचे सत्र होणार असून, दुपारी ३ वाजता ‘बहुभाषी काव्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. या सत्रात सतेज जानोरकर, संतोष सिंह, ओबेद आझम अझमी, नवीन आणि राजेश हिंगु सहभागी होणार आहेत. अभिजित जोग यांचे 'मी आणि माझे लेखन' तसेच प्रशांत पोळे यांचा 'इंडिया ते भारत एक प्रवास' या पुस्तकाचे प्रकाशन आणि कथावाचन होणार आहे.(Mumbai Book Festival 2026 Sessions)
२७ तारखेला सकाळी तथ्य, कल्पना आणि मुखपृष्ठ या विषयावर अंशुल चतुर्वेदी यांचे सत्र होणार आहे. एशियाटिक सोसायटी मुंबईतर्फे आयोजित 'इंडियाज रोग हिस्टोरियन्स' या पुस्तकावर परिसंवाद होणार असून यात अरविंद सिंह आणि विनय सहस्त्रबुद्धे सहभागी होणार आहेत. याशिवाय 'लॉरी बेकर-ट्रुथ इन आर्किटेक्चर' या पुस्तकासह दिवसभर विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. २८ नोव्हेंबर रोजी वाचनसंस्कृती कशी वाढेल या विषयावर पुंडलिक पै यांचे चर्चासत्र होणार आहे. यासोबतच संविधान संकल्पनेचा विकास यावर रमेश पतंगे यांचे सत्र आहे. आचार्य पवन त्रिपाठी हे स्वातंत्र्यलढ्यात मुंबईचे योगदान या विषयावर संवाद साधतील. शेवटच्या दिवशी अर्थात २९ तारखेलाही दिवसभर आध्यात्म, तंत्रज्ञान, लेखन, काव्य या विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
पुस्तक महोत्सवातील या सत्रांमधून इतिहास, साहित्य, भारतीय ज्ञानपरंपरा, संविधान आणि भाषिक वैविध्य अशा विविध विषयांवर संवाद घडणार असल्याने तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत हा महोत्सव निश्चितच सर्वांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.(Mumbai Book Festival 2026 Sessions)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....