नेहरू सेंटरमध्ये आता दर रविवारी रंगणार मराठी नाटक; मराठी रंगभूमीला नवे व्यासपीठ!

    20-Nov-2026

natak
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : marathi natak prashant damle मराठी नाटकांचे प्रयोग अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत आणि मराठी रंगभूमीला नवे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेहरू सेंटरची नाट्यप्रयोगांसाठीची उत्तम वास्तू असूनही येथे मराठी नाटकांचे प्रयोग तुलनेने कमी होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद आणि नेहरू सेंटर च्या संयुक्त विद्यमाने आता मराठी नाटकांचे प्रयोग दर रविवारी दुपारी ३.३० वाजता नेहरू सेंटरमध्ये आयोजित केले जाणार आहेत असल्याची माहिती नाट्यपरिषदेचे कार्यवाह अजित भुरे यांनी दिली. यावेळी नेहरू सेंटरचे प्रशासकीय आणि सांस्कृतिक उपक्रमांचे मुख्य कार्यकारी नितीन करीर आणि अभिनेत्री चिन्मयी सुमित उपस्थित होते.
याबाबत नितीन करीर यांनी माहिती देताना सांगितले की, नेहरू सेंटरची वास्तू नाटकांसाठी अत्यंत उत्तम आहे. मात्र, येथे मराठी नाटकांचे प्रयोग अपेक्षेप्रमाणे होत नाहीत. त्यामुळे मराठी नाटकांनी या व्यासपीठाचा अधिकाधिक वापर करावा, हा आमचा प्रयत्न आहे. यासाठी 'अविष्कार' संस्थेसोबत टाय-अप करून विविध नाट्यविषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. केवळ मराठीच नव्हे, तर इतर भाषांतील नाटकांचे प्रयोगही येथे आयोजित केले जाणार आहेत.marathi natak prashant damle
अजित भुरे यावेळी म्हणाले कि, 'हि दोस्ती तुटायची नाय' या नाटकाच्या प्रयोगाने याची सुरुवात झाली असून नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता आगामी नाट्यप्रयोगांमध्ये 'भूमिका', 'जर तरची गोष्ट' या नाटकांचे प्रयोग होणार आहेत. याशिवाय , 'काटकोन त्रिकोण', 'आमने-सामने' या नाटकांचे प्रयोगही आयोजित केले जाणार आहेत. तसेच 'मराठी बाणा' हा विशेष कार्यक्रमही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.त्यामुळे प्रेक्षकांनी या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा असे भुरे यावेळी म्हणाले.marathi natak prashant damle
या उपक्रमाच्या माध्यमातून प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांना नेहरू सेंटरमध्ये स्थान दिले जाणार आहे. मराठी रंगभूमीवरील वैविध्यपूर्ण प्रयोगांना प्रोत्साहन देतानाच नाट्यरसिकांना दर्जेदार नाट्यकृती एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नेहरू सेंटरमध्ये मराठी नाटकांची नियमित वर्दळ वाढणार का, याकडे नाट्यरसिकांचे लक्ष लागले आहे.marathi natak prashant damle
 




संबंधित मजकूर