उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या ‘जिजाई’ला शुभेच्छा!

    20-Nov-2026

rinku
 
मुंबई - jijai rinku rajguru eknath shinde स्त्री संरक्षणाच्या लढ्याची थरारक गोष्ट मांडणाऱ्या झी स्टुडिओज प्रस्तुत ‘जिजाई’ या मराठी चित्रपटाच्या नव्या पोस्टरचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिनेत्री रिंकू राजगुरू, दिग्दर्शक तृशांत फुलवंती इंगळे आणि सहनिर्माते तुषार राऊत उपस्थित होते. या भेटीदरम्यान चित्रपटाचा ट्रेलरही एकनाथ शिंदे यांना दाखवण्यात आला. ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांनी चित्रपटाच्या संकल्पनेचे आणि सादरीकरणाचे कौतुक करत संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्त्रीच्या आत्मसन्मानासाठी आणि संरक्षणासाठी ती स्वतःच सक्षमपणे लढा देऊ शकते, हा विचार ‘जिजाई’मधून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. रिंकू राजगुरू मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या या चित्रपटात किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तृशांत फुलवंती इंगळे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स यांची निर्मिती आहे. नुपूर गुहा आणि तुषार राऊत हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. स्त्रीच्या सामर्थ्याची आणि संघर्षाची थरारक कथा सांगणारा ‘जिजाई’ आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.jijai rinku rajguru eknath shinde
 




संबंधित मजकूर