गोवा (विशेष प्रतिनिधी ) : iffi 2026 tighi sonalee kulkarni महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती, सांस्कृतिक वैविध्य आणि चित्रीकरणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधांचे सामर्थ्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यंदाही गोवा येथे आयोजित ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सहभागी होत आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या महोत्सवासाठी महामंडळाच्या वतीने ‘सिनेमॅन’ आणि ‘तिघी’ या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली असून महामंडळासह एन. डी. स्टुडिओ आणि कोल्हापूर चित्रनगरीचे विशेष दालनही महोत्सवात उभारण्यात येणार आहे. याशिवाय, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातील भविष्यातील संधी, विकासाच्या शक्यता आणि जागतिक स्तरावरील सहकार्याचा वेध घेणारा विशेष परिसंवादही आयोजित करण्यात आला आहे.
जगभरातील चित्रपट आणि चित्रपट निर्मितीतील नवनवीन प्रवाह यांना एकत्र आणणारा 'इफ्फी' महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे संपन्न होत आहे. सन २०१५ पासून महामंडळ या महोत्सवात सहभागी होत असून दरवर्षी महामंडळाकडून उत्कृष्ट मराठी चित्रपटांची या महोत्सवातील 'वेव्हज् फिल्म बझार' या विभागात प्रदर्शनासाठी निवड करण्यात येते. यंदाच्या महोत्सवात महामंडळाच्या वतीने दोन वेगळ्या आशयांचे मराठी चित्रपट सादर करण्यात येणार आहेत. त्यामध्ये उमेश मोहन बागडे दिग्दर्शित ‘सिनेमॅन’ आणि जिजीविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ या चित्रपटांचा समावेश आहे.iffi 2026 tighi sonalee kulkarni
‘सिनेमॅन’ हा चित्रपट दुर्गम भागांतील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत अर्थपूर्ण चित्रपट पोहोचविण्याचा ध्यास घेतलेल्या आनंद या निवृत्त शिक्षकाच्या प्रेरणादायी कार्याभोवती फिरतो. चित्रपटांच्या माध्यमातून मुलांमध्ये चित्रपटविषयक जाणिवा निर्माण करण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचा मागोवा एका तरुण चित्रपटकर्मीकडून घेतला जाताना, या प्रवासात मुलांची कल्पनाशक्ती, बालविश्व आणि जागतिक सिनेमाशी जोडल्या जाणाऱ्या एका रंजक कथानुभवाची उकल होते. चित्रपटाच्या माध्यमाची ताकद आणि समाजातील त्याचे शैक्षणिक-सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. २२ नोव्हेंबरला चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे.iffi 2026 tighi sonalee kulkarni
तर ‘तिघी’ हा चित्रपट आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यांचा भावनिक वेध घेतो. आईच्या आजारपणामुळे अनेक वर्षांपासून दुरावलेल्या दोन बहिणी पुन्हा एकत्र येतात. त्यातून जुन्या आठवणी, मनातील सल, नात्यांमधील ताणतणाव आणि कुटुंबात दडून राहिलेली रहस्ये समोर येतात. जिजीविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटात भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मानवी नातेसंबंध, स्त्रीजीवन आणि कौटुंबिक भावविश्व यांचे संवेदनशील चित्रण करणारा हा चित्रपट आहे. २३ नोव्हेंबर रोजी महोत्सवात हा चित्रपट दाखवला जाणार आहे.iffi 2026 tighi sonalee kulkarni
या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील आशयवैविध्य, वेगवेगळ्या विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि प्रभावी कथाकथनाची परंपरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.iffi 2026 tighi sonalee kulkarni
महोत्सवातील महामंडळाच्या विशेष दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, स्टुडिओ, चित्रीकरण स्थळे, तांत्रिक सुविधा आणि निर्मितीविषयक संधी यांची माहिती देश-विदेशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, निर्मिती संस्था आणि प्रतिनिधींना करून देण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळासह एन. डी. स्टुडिओ आणि कोल्हापूर चित्रनगरी यांच्याही दालनांत समावेश असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीच्या विविध केंद्रांची क्षमता, त्यांच्याकडील सुविधा आणि निर्मात्यांसाठी उपलब्ध असलेले पर्याय एकाच व्यासपीठावर मांडता येणार आहेत.iffi 2026 tighi sonalee kulkarni
मुंबई ही भारतीय चित्रपटसृष्टीचे महत्त्वाचे केंद्र असून, राज्यातील विविध भागांमध्येही चित्रपट निर्मितीच्या संधी विस्तारत आहेत. स्टुडिओ व्यवस्था, चित्रीकरणासाठीची नैसर्गिक व बंदिस्त स्थळे, तांत्रिक मनुष्यबळ, निर्मितीपश्चात सेवा आणि स्थानिक कलावंतांची उपलब्धता या घटकांच्या आधारे महाराष्ट्रात राज्य शासनाकडून व्यापक चित्रपट निर्मिती परिसंस्था विकसित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महामंडळाचे दालन हे केवळ माहिती देणारे प्रदर्शन न राहता, महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निर्माते आणि संस्थांना आकर्षित करणारे तसेच संभाव्य सहकार्य आणि व्यावसायिक भागीदारीचे मार्ग खुले करणारे व्यासपीठ ठरणार आहे.
iffi 2026 tighi sonalee kulkarni
महाराष्ट्राला चित्रपट निर्मिती आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी अधिक सक्षम, आकर्षक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक केंद्र म्हणून पुढे आणण्याच्या दृष्टीने 'इफ्फी'तील सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 'इफ्फी'च्या निमित्ताने जगभरातील चित्रपट निर्माते, निर्मिती संस्था, चित्रपट प्रशिक्षण संस्था, तंत्रज्ञ आणि विविध देशांतील प्रतिनिधी एकत्र येत असतात. या संधीचा उपयोग करून महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती आणि प्रशिक्षण क्षेत्रासाठी नव्या सहकार्याच्या शक्यता तपासण्याचाही महामंडळाचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी दिली.iffi 2026 tighi sonalee kulkarni
'इफ्फी'च्या 'नॉलेज सीरिज'अंतर्गत २३ नोव्हेंबर रोजी महामंडळाच्या वतीने 'महाराष्ट्रातील सांस्कृतिक व चित्रपट परिसंस्था : संधी, विकास आणि शक्यता' या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राची सध्याची स्थिती, निर्मिती व वितरणातील बदलते प्रवाह, नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधी, चित्रपट निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा, जागतिक बाजारपेठेतील मराठी चित्रपटांचे स्थान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या शक्यता अशा विविध पैलूंवर या परिसंवादात चर्चा होणार आहे. या परिसंवादात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक निखिल महाजन, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सुहृद गोडबोले, सिनेमॅटोग्राफर व दिग्दर्शक महेश लिमये आणि सिनेअभ्यासक डॉ. संतोष पाठारे सहभागी होणार आहेत.
iffi 2026 tighi sonalee kulkarni