गोवा (विशेष प्रतिनिधी ): iffi 2026 cinema जगभरातील चित्रपटप्रेमींचे आकर्षण असलेल्या ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI 2026) आज गोव्यात दिमाखात शुभारंभ झाला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे आयोजित भव्य उद्घाटन सोहळ्याने जागतिक चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली. यंदा ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ (Stories Without Borders) ही मध्यवर्ती संकल्पना असून, देशांच्या सीमा ओलांडणाऱ्या कथा, संस्कृती आणि चित्रपटांचा अनोखा संगम या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि महोत्सवाचे संचालक, ज्येष्ठ दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.iffi 2026 cinema
उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केज यांचे सिंफॉनिक ऑर्केस्ट्रा सादरीकरण. ‘अ वर्ल्ड ऑफ सिनेमा थ्रू म्युझिक’ या विशेष कार्यक्रमातून संगीताच्या माध्यमातून जागतिक सिनेमाचा प्रवास मांडण्यात आला. विविध देशांच्या संगीतपरंपरांचा संगम घडवणारे ‘म्युझिक विदाऊट बॉर्डर्स’ हे सादरीकरणही सोहळ्याच्या आकर्षणांपैकी एक होते. ‘बियॉन्ड द फ्रेम’ या विशेष नृत्याविष्कारातून इफ्फीच्या मानचिन्हातील मोराची प्रतिमा कलात्मक पद्धतीने साकारण्यात आली.iffi 2026 cinema
यंदाच्या इफ्फीचा उद्घाटन चित्रपट म्हणून पोलिश दिग्दर्शक पावेल पाव्लिकोव्स्की यांच्या ‘फादरलँड’ची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय चित्रपटविश्वातील दर्जेदार कलाकृतींची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.iffi 2026 cinema
यंदाच्या महोत्सवात ८६ देशांतील १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. भारतीय सिनेमासाठी महत्त्वाच्या असलेल्या इंडियन पॅनोरमा विभागात १८ भाषांमधील ७६ चित्रपटांचा समावेश आहे. स्पेन हा यंदाचा 'कंट्री ऑफ ऑनर', तर रशिया हा 'पार्टनर कंट्री' आहे.iffi 2026 cinema
याशिवाय अॅनिमेशन चित्रपट, चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेवर आधारित ‘फिल्म्स अबाऊट फिल्म्स’, नवोदित चित्रपटनिर्मात्यांसाठी ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ आणि चित्रपट उद्योगातील व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारा ‘वेव्ह्ज फिल्म बझार’ हे विभागही यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण आहेत.iffi 2026 cinema
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीला एकत्र आणणारा इफ्फी हा केवळ चित्रपटांचा महोत्सव नसून, विचारांची, संस्कृतींची आणि कलात्मक अभिव्यक्तीची देवाणघेवाण करणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यंदाच्या ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ या संकल्पनेतून जागतिक सिनेमाच्या नव्या प्रवासाला गोव्यात सुरुवात झाली आहे.iffi 2026 cinema