मुंबई (विशेष प्रतिनिधी ) :iffi 2026 cinema जागतिक चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कलाकृती, दिग्गज कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपटप्रेमींच्या उपस्थितीत गोव्यात आजपासून ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) दिमाखात सुरुवात होत आहे. २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान पार पडणाऱ्या या नऊ दिवसीय महोत्सवात जगभरातील चित्रपटांचा अनोखा आविष्कार अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
यंदाच्या इफ्फीची संकल्पना 'Stories Without Borders' अर्थात सीमांच्या पलीकडील कथा अशी आहे. भाषा, संस्कृती आणि भौगोलिक सीमा ओलांडत चित्रपटांच्या माध्यमातून मानवी भावना आणि विविध देशांतील कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला जाणार आहे. यंदा ८६ देशांमधील १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी चित्रपटप्रेमींना मिळणार आहे.iffi 2026 cinema
'फादरलँड'ने महोत्सवाची सुरुवात
यंदाच्या महोत्सवाची सुरुवात पावेल पाव्लिकोव्स्की दिग्दर्शित 'फादरलँड' या चित्रपटाने होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतलेल्या या चित्रपटामुळे महोत्सवाच्या उद्घाटनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.iffi 2026 cinema
इंडियन पॅनोरमा विभाग हे यंदाच्या इफ्फीचे प्रमुख आकर्षण असणार आहे. १८ भाषांमधील भारतीय चित्रपटांना या विभागात स्थान देण्यात आले आहे. फीचर आणि नॉन-फीचर चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीतील आशय, प्रयोगशीलता आणि प्रादेशिक भाषांमधील वैविध्य अनुभवता येणार आहे.iffi 2026 cinema
यंदाच्या महोत्सवात रशियाला भागीदार देशाचा, तर स्पेनला 'कंट्री ऑफ ऑनर'चा मान देण्यात आला आहे. या दोन्ही देशांतील चित्रपट, संस्कृती आणि चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या शैलींचा परिचय भारतीय प्रेक्षकांना होणार आहे.iffi 2026 cinema
केवळ चित्रपटांचे प्रदर्शन एवढ्यापुरता इफ्फी मर्यादित नसून, मास्टरक्लास, कार्यशाळा, परिसंवाद आणि दिग्गज चित्रपट निर्माते व कलाकारांशी संवाद असे विविध उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय 'WAVES Film Bazaar'च्या माध्यमातून चित्रपट निर्माते, वितरक आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे.iffi 2026 cinema
एकूणच, आजपासून गोव्यात सुरू होणारा ५७वा इफ्फी हा केवळ चित्रपट महोत्सव नसून जागतिक चित्रपट संस्कृतीचा उत्सव ठरणार आहे. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच नव्या प्रतिभांना संधी देणाऱ्या या महोत्सवाकडे देश-विदेशातील चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे. पुढील नऊ दिवस गोवा जागतिक सिनेमाच्या रंगात रंगणार आहे.iffi 2026 cinema
'आदीअनंत', 'देऊळबंद २', 'बाप्या',' तिघी', 'शिक्षा', आभाळ-वृक्ष, चांदोबा या सात चित्रपटांची इंडियन पॅनोरमासाठी निवड झाली आहे तर तू आहेस ना या चित्रपटाची गाला प्रीमियर विभागात निवड झाली आहे. नाना पाटेकरांना आदरांजली म्हणून नटसम्राटचे खास स्क्रिनिंग होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त 'साधी माणसं'च्या खास शोचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच 'देवखेळ'ची सर्वोत्कृष्ट वेब सीरिज पुरस्काराच्या विभागात निवडझाली आहे.iffi 2026 cinema