सोन्याच्या दरात तीव्र घसरण! वर्षभरात पहिल्यांदाच १.२३ लाखांवर भाव; चांदी दहा हजारांनी घसरून दीड लाखांवर!

    20-Nov-2026   

Gold Price Today November 20 2026
  
मुंबई (Gold Price Today November 20 2026): गेल्या वर्षभरातील सर्वात मोठा निच्चांक गाठत सोन्याच्या दरांमध्ये शुक्रवारी तीव्र घसरण नोंदवली. १० ग्रॅम सोन्याचा भाव ५ हजार ९४७ रुपयांनी घसरुन १ लाख २३ हजार ३०८ रुपयांवर नोंदविण्यात आला. सोन्याचा दर वर्षभराच्या निचांकावर पोहोचला. गतवर्षात २४ नोव्हेंबर रोजी १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख २३ हजार ३०८ रुपये इतका होता. त्यानंतर भाव वधारत गेला होता. चांदीच्या भावातही ९ हजार ७८९ रुपयांनी घसरण झाली.
 
चांदी रु. १.५० लाख प्रतिकिलो नोंदविण्यात आली. अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याने आणि नफावसुलीचे प्रमाण वाढल्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाल्याचे दिसून आले आहे. २० नोव्हेंबर रोजी १४ कॅरेट सोन्याची किंमत रु. ७२ हजार २९७, १८ कॅरेटचा भाव रु. ९२ हजार ६८८, २२ कॅरेटचा भाव रु. १ लाख १३ हजार २०३ तर २४ कॅरेट सोन्याचा भाव रु. १ लाख २३ हजार ५८४ इतका होता. मुंबई, दिल्लीसह राज्यातील सोन्याचा भाव १.२५ लाख इतका नोंदविण्यात आला होता.  (Gold Price Today November 20 2026)
 
सोने ३० टक्क्यांनी तर चांदी ६० टक्क्यांनी घसरली
 
वर्षभरात सोन्याच्या भावात चढ-उतार दिसत होते. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सोन्याचे दर रू. १.३३ लाखांवर होते. २९ जानेवारी १.७६ लाखांपेक्षा अधिक पोहोचले. तेव्हापासून सोन्याचे दर ५२ हजार ४०० रुपयांनी वाढले होते. आजघडीला यात ३० टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच चांदी ३१ डिसेंबर रोजी २०२५ रोजी २.३० लाख रुपये होती, २९ जानेवारी रोजी ३.८० लाखांवर दर पोहोचले होते. त्यानंतर चांदीच्या दरात तब्बल २.२९ लाख म्हणजे ६० टक्क्यांनी स्वस्त झाली आहे.  (Gold Price Today November 20 2026)
 
सोन्याच्या भेसळीबद्दल सतर्कता आणि सावध राहण्याची गरज
 
गेल्या काही दिवसांपासून सोन्यातील कथित मिश्रणाबद्दलच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध होत आहेत. याबद्दल ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलचे (जीजेसी) अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, रेनियम आणि इरिडियम आधारित मिश्रधातूंचा वापर सोन्याचे वजन वाढविण्यासाठी केला जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली मात्र, त्यामुळे सोन्याच्या शुद्धतेत कुठलीही वाढ होत नाही. जीजेसीने याबद्दल भारतीय मानक ब्युरोकडे (बीआयएस) याबद्दल तक्रार केली होती. त्यानुसार बीआयएस या प्रकरणी बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सोनेखरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाबरुन जाण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. (Gold Price Today November 20 2026)
 
आम्ही सर्व ज्वेलर्सना आवाहन करतो की त्यांनी अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण प्रणाली अधिक मजबूत करावी तसेच BIS हॉलमार्किंग नियमांचे पूर्ण पालन आणि पारदर्शकता सुनिश्चित करावी. ग्राहकांनीदेखील केवळ प्रतिष्ठित ज्वेलर्सकडूनच दागिने खरेदी करावेत, योग्य बिल घ्यावे आणि खरेदीपूर्वी हॉलमार्कची पडताळणी करावी. - अविनाश गुप्ता, उपाध्यक्ष, जीजेसी  (Gold Price Today November 20 2026)
 
 
 




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर