GIFT निफ्टीचा विक्रमी उच्चांक; ओपन इंटरेस्ट २२.२१ अब्ज अमेरिकी डॉलरवर!

    20-Nov-2026
 
GIFT Nifty Open Interest Record
 
मुंबई (GIFT Nifty Open Interest Record) : GIFT निफ्टीने भारतीय भांडवली बाजाराच्या विकासाच्या प्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी GIFT निफ्टीचा ओपन इंटरेस्ट (Open Interest) २२.२१ अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजेच २,०७,३३० कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला. या दिवशी एकूण ४,३८,८८७ कॉन्ट्रॅक्ट्स ओपन होते. GIFT निफ्टीच्या आतापर्यंतच्या प्रवासातील हा सर्वोच्च ओपन इंटरेस्ट ठरला आहे.
 
यापूर्वी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी GIFT निफ्टीने २१.८४ अब्ज अमेरिकी डॉलरचा ओपन इंटरेस्ट नोंदवला होता. मात्र, आता हा जुना विक्रम मागे टाकत GIFT निफ्टीने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. (GIFT Nifty Open Interest Record)
 
३ जुलै २०२३ रोजी GIFT निफ्टीचे पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू झाल्यापासून NSE इंटरनॅशनल एक्सचेंज (NSE IX) वरील व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत GIFT निफ्टीमध्ये एकूण ८.०७ कोटींहून अधिक कॉन्ट्रॅक्ट्सचे संचयी व्यवहार झाले आहेत. त्यांचा एकूण संचयी टर्नओव्हर ३.७३ ट्रिलियन अमेरिकी डॉलरवर पोहोचला आहे.
 
GIFT निफ्टीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल NSE IX ने आनंद व्यक्त केला आहे. या यशासाठी सर्व बाजार सहभागींचे एक्सचेंजने आभार मानले आहेत. बाजारातील सहभागींचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि पाठिंब्यामुळेच GIFT निफ्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याचे एक्सचेंजने नमूद केले. (GIFT Nifty Open Interest Record)
 
 




संबंधित मजकूर