स्वतःच्या नावापेक्षा शिष्यांच्या कामगिरीतून ओळख निर्माण करणारा प्रशिक्षक विरळाच. दिनेश लाड यांचा प्रवास अशाच गुरु-शिष्य परंपरेचा प्रत्यय देणारा आहे. एका गुरूने दिलेली पाठीवरची कौतुकाची थाप आयुष्याला नवी दिशा देऊ शकते, याची साक्ष म्हणजे लाड यांचे आयुष्य! त्यांच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेणारा हा लेख...
आजच्या डिजिटल युगात, ‘एफएम रेडिओ’ केवळ गाण्यांपुरते किंवा मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, कला, साहित्य आणि क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. आकाशवाणीच्या ‘विविध भारती’ केंद्राची परंपराही रंजक अशीच! ऑक्टोबरमध्ये ‘विविध भारती’वर दोन भागांत प्रसारित झालेला असाच एक विशेष कार्यक्रम, क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरला. या कार्यक्रमाचे पाहुणे होते, क्रिकेटजगताला ‘हिटमॅन’ रोहित शर्मासारखे अनेक शिलेदार मिळवून देणारे, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश जवाहर लाड!
जिथे ‘एफएम’वर एरव्ही गाण्यांची मैफील रंगते, तिथे जेव्हा एका गुरूचे प्रेरणादायी क्रिकेटविश्व उलगडले जाते, तो अनुभव अधिकच समृद्ध करणारा ठरतो. ‘तुमचा क्रिकेटशी असलेला संबंध कुठून सुरू होतो,’ या साध्या, पण तितयाच औत्सुयपूर्ण प्रश्नाने या मुलाखतीची सुरुवात झाली आणि दिनेश लाड यांनी आजोळच्या मुक्कामातला काळ आणि त्यांचं क्रिकेटविश्व लीलया उलगडलं.
दिनेशला मिळतो गुरू : दिनेश लाड हे मूळचे कोकणवासीय. त्यांचे कुटुंब उपजीविकेसाठी मुंबईत आले. लहानपणी मुंबईच्या माहीम येथे आपल्या मामांकडे रहाणारा दिनेश, तेथील मुलांबरोबरच गल्लीत क्रिकेट खेळत असे. मामाकडे राहताना दिनेश यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, मराठी माध्यमातून झाले. त्या शाळेमध्ये क्रिकेट किंवा इतर कोणत्याही मोठ्या खेळासाठीचे मैदान, क्रीडा साहित्य अथवा क्रीडा संस्कृतीचाच पूर्णपणे अभाव होता. त्यामुळे लहानपणी त्यांच्यातील क्रिकेटविषयीची आवड, माहीमच्या गल्लीबोळातच टेनिस व रबर बॉल क्रिकेट खेळताना विकसित झाली. दिनेश यांच्या शाळेचा आणि त्यांच्या कुटुंबाचा क्रीडाविश्वाशी तसा काहीही संबंध नव्हताच. ज्या शाळेत क्रिकेटचा मागमूसही नव्हता, अशाच शाळेत शिकलेला मुलगा पुढे जाऊन स्वतःच्या जिद्दीवर लब क्रिकेट खेळला आणि नंतर द्रोणाचार्य पुरस्कारविजेता महान प्रशिक्षकही झाला.
गल्लीत मोठ्यांबरोबर खेळणार्या दिनेशचा खेळ अनेकांना आवडत असे. बोर्डाची परीक्षा झाल्यावर दिनेशचा हा खेळ पाहूनच, तेथील दिलीप खेडेकरांनी त्याला चर्चगेटच्या ‘ससाणे क्रिकेट लब’ला नेले. रमाकांत आचरेकर सरांचे मुख्य सराव केंद्र दादरचे शिवाजी पार्क असले, तरी मुंबईच्या स्थानिक आणि लब क्रिकेटच्या संदर्भात चर्चगेट येथील ‘ससाणे क्रिकेट लब’शी ते जोडलेले होते. मुंबईतील स्थानिक ‘कांगा लीग’ आणि लब क्रिकेट सामन्यांदरम्यान, आचरेकर सर वेगवेगळ्या मैदानांवर आणि लब्समध्ये मार्गदर्शनासाठी जात. चर्चगेट येथील ओव्हल मैदान किंवा क्रॉस मैदानावर ‘ससाणे क्रिकेट लब’चे सामने व सराव चालत, जिथे आचरेकर सर तरुण खेळाडूंना पारखण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कायम उपस्थित राहत. अशाच मैदानावर दिनेशला आचरेकर सरांचे पाहिले दर्शन झाले, रमाकांत विठ्ठल आचरेकर! म्हणजे ज्यांना भारतीय क्रिकेटजगतातील एक अत्यंत निष्णात आणि कडक शिस्तीचे प्रशिक्षक म्हणून आपण ओळखतो, ज्यांनी भारताला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांसारखे महान क्रिकेटपटू दिले. क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना ‘द्रोणाचार्य’ आणि ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठित पुरस्कारांनी, सन्मानित करण्यात आले होते. दिनेशला पाहताच आचरेकर सरांनी दिनेशला विचारले, ‘काय खेळतोस तू?’ दिनेश म्हणाला, ‘मी फलंदाजी आणि गोलांदाजी दोन्ही करतो.’ यावर आचरेकर सर दिनेशला झलक दाखवायला सांगतात. त्यावेळेस दिनेशच्या पायात कॅनव्हासचे साधे बूट होते आणि अंगात फाटकी ट्रॅकसूटची पँट. त्याला पाहून आचरेकर सरांनी त्याला ‘उद्या नक्की परत ये,’ सांगितलं. हे ऐकून दिनेश घरी जातो आणि दुसर्या दिवशी आचरेकर सरांना पुन्हा भेटतो.
मिळते शुल्कमाफी : त्या काळात क्रिकेटसाठी पांढरे कपडे वापरण्याचा नियम असे. कारण तेव्हा एक दिवसीय, टी-ट्वेंटी असे क्रिकेट नव्हते. ते दिवस कसोटी क्रिकेटचे होते. आचरेकर सरांना जसे समजले की, दिनेशकडे क्रिकेटचा गणवेश नाही, तसे त्यांनी तिसर्या दिवशी दिनेशला क्रिकेटचा पांढरा गणवेश दिला. शिवाय, त्याला ४०० रुपये देत सांगितले की, ‘या पैशांतून तुझ्यासाठी क्रिकेटचे बूट आण आणि उद्यापासून तेच बूट आणि हा दिलेला गणवेश घालून सरावाला ये.’ आचरेकर सरांनी दिलेल्या गणवेशातच दिनेश यांचे क्रिकेट आकार घेऊ लागते. तेव्हा त्या क्रिकेट लबचे शुल्क सात रुपये असे. मात्र, तेदेखील दिनेशसारख्या होतकरू युवकांकडे तेव्हा नसे. आचरेकर सरच त्यांचे शुल्क माफ करत असत. खेळाडूंच्या मागे भक्कम असणारे, असे ते आचरेकर सर होते!
सरांपासून दूर होतात : दिनेश यांनी आचरेकर सरांकडे सराव सुरू केल्यानंतर दोन वर्षांतच, सरांकडे जाण्यांचं अचानकपणे बंद करतात. बारावीची परीक्षा झाल्यावर वांद्रे पूर्वतील ‘एमआयजी क्रिकेट लब’ या मुंबईतील अग्रगण्य आणि उच्चभ्रू क्रिकेट लबमध्ये दिनेश सरावासाठी जाऊ लागतात. दरम्यान १९७९ मध्ये दिनेश यांना ‘कोलगेट’ कंपनीमध्ये नोकरीची संधी येते. यानंतर, पुढे क्रिकेटमुळेच दिनेश यांना १९८२ मध्ये रेल्वेमध्ये नोकरी मिळते. १९८५ मध्ये दिनेश यांचे लग्न होते आणि क्रिकेट काही काळासाठी बाजूला पडते. रेल्वेमध्ये असलेल्या खेळाडूंना ऑन-ड्यूटी खेळण्यासाठी बाहेरगावी धाडले जात असे. त्यासाठी त्यांना विविध भत्ते मिळत असत.
दोन वर्षांनंतर रेल्वेतील फिरती बंद झाल्यावर, १९८९ मध्ये दिनेश यांची बदली मुंबईत झाली. येथे त्यांना कार्यालयीन कामकाजच करावे लागले. मग, दिनेश यांनी मुंबईतल्या सहकार्यांसमवेतच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. नरेश चौरी नावाचा दिनेश यांचा एक मित्र होता. ज्याला आचरेकर सर दिनेश बरोबरच त्यांच्या स्कूटरवरून मैदानावर घेऊन जात असत. पण, अनेकदा सर येताच दिनेश पळून जाऊन गल्ली क्रिकेटच खेळत असे. नरेश सगळ्यांना सांगे की, दिनेशला सर त्याला ‘प्रमोट’ करायला बघतात, तर तो त्यात रसच दाखवत नाही. अशा वागणुकीने सरही दिनेशचा त्याचा नाद सोडून देत. त्याकाळी अनेकजण क्रिकेटमुळे नोकरी लागली की, थोडे खेळून खेळणे थांबवत. यानंतर नोकरी, संसार यांवरच लक्ष केंद्रित करून, अल्पसंतुष्ट होत. क्रिकेटमुळे नोकरी मिळाली की, त्यांच्या लेखी खेळ नगण्यच असे. आजही असे अनेकजण आहेत.
फिल्मी कनेशन : दिनेश हे क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशिक्षक असले, तरी मागे एकदा त्यांचे ‘फिल्मी कनेशन’ असल्याची चर्चा समाजमाध्यमावर रंगली होती. एका हिंदी चित्रपटातील क्रिकेटच्या दृष्याच्या चित्रीकरणावेळी, डेव्हिड धवन यांनी मार्गदर्शन करण्यासाठी दिनेश यांनाच बोलावले होते. त्यांच्याच मार्गदर्शनात त्याचे चित्रीकरणही करण्यात आलं होतं.डेव्हिड धवनने दिग्दर्शित केलेला तो हिंदी चित्रपट होता ‘हुक या क्रूक.’ दुर्दैवाने काही कारणांमुळे हा चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नव्हता, हे अलाहिदा!
युरोपात क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी, जॉन अब्राहम आणि अन्य भारतीय कलाकार दहा १५ वर्षांपूर्वी परदेशी गेले होते. जॉन अब्राहमने एक संघदेखील खरेदी केला होता. त्यावेळी जॉननेही क्रिकेटचे काही धडे लाड सरांकडेच गिरवले होते.त्यामुळे एका प्रसंगी जॉनने लाड सरांना फोन करून, ‘सर मैं जॉन बात कर रहा हूँ. अरे सर इनको बताओ ना की, जॉन कैसे बॅटिंग करता था...’ असे म्हटले होते. दिनेश हे खेळाडूंबरोबरच कलाकारांमधेही प्रिय होते.
जीवनातील टर्निंग पॉईंट : आचरेकर सर हे मुंबईतील ‘शारदाश्रम’ शाळेचे मुख्य प्रशिक्षक होते. एका शालेय क्रिकेट स्पर्धेतील एका सामान्यात लाड ज्या शाळेचे प्रशिक्षक होते, त्या संघाने सरांच्या शाळेला हरवलं होतं. त्यावेळी लाड सरांच्या बाजूलाच आचरेकर सर बसले होते. सामना संपताच, आचरेकर सर दिनेशची पाठ थोपटतात आणि म्हणतात, ‘वेल डन राजू!’ आचरेकर सरांनी पाठीवर दिलेली शबासकी, दिनेश यांच्या जीवनातील मोठाच ‘टर्निंग पॉईंट’ ठरली. दिनेश यांना राजू या टोपणनावानेच सर हाक मारत असत. या घटनेनंतर लाड क्रिकेट शिकवण्यात अधिक रुची घेऊ लागले.
आचरेकर सर हे सहजासहजी कोणाचे कौतुक न करण्यासाठीच सर्वश्रुत होते. मैदानात कितीही धावा काढल्या किंवा बळी घेतले, तरी सरांच्या तोंडून कौतुकाचा एक शब्द निघणे, म्हणजे पर्वणीच! आचरेकर सरांच्या तोंडून निघालेल्या ‘वेल डन राजू’ या तीन शब्दांतच, राजूसाठी जगातील संपूर्ण आनंद सामावलेला होता. ती पाठीवरची थाप केवळ कौतुकाचीच नव्हती, तर ती निष्ठेची, कष्टाची आणि शिस्तीची पोचपावती होती. पुढे जेव्हा दिनेश स्वतः प्रशिक्षक झाले, तेव्हा आचरेकर सरांचा हाच वारसा आणि तीच शिकवण त्यांनी आपल्या आचरणात आणली.
लाड सरांची पारखी नजर : दिनेश यांच्या प्रवासातील सर्वांत सुवर्णपान म्हणजे, रोहित शर्माचा शोध! एका स्थानिक सामन्यात अवघ्या १२-१३ वर्षांच्या रोहितची गोलंदाजी आणि फलंदाजीतील नैसर्गिक गुणवत्ता पाहून, लाड सरांनी क्षणाचाही विलंब न लावता, त्याला स्वामी विवेकानंद शाळेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. रोहितच्या कौटुंबिक परिस्थितीची जाणीव असल्याने, लाड सरांनी त्याचे शुल्कदेखील माफ करून घेतले. इतकेच नव्हे, तर रोहितला आपल्याच घरी ठेवून, स्वतःच्या मुलासारखेच त्याला जपले. लाड सरांनी रोहितच्या कौशल्याला धार लावली. आज तोच रोहित शर्मा भारतीय संघाला कर्णधार म्हणून जगज्जेतेपद मिळवून देतो, तेव्हा त्यामागे या लाड सरांची वर्षानुवर्षांची तपश्चर्याही असते. केवळ रोहितच नाही, तर पालघरहून पहाटेच्या लोकलने प्रवास करणार्या शार्दूल ठाकूरमधील जिद्द लाड सरांनीच ओळखली. त्याला मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात टिकवून ठेवण्यासाठी, स्वतःच्या घरी राहण्याची सोय करण्यापासून ते त्याच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीपर्यंत, लाड सरांनी छत्रछाया धरली.
या प्रवासात लाड सरांचे सुपुत्र सिद्धेश लाड यांनीही वडिलांच्या मार्गदर्शनाखाली घाम गाळला. मुंबईच्या रणजी संघातून खेळताना त्यांनी खोर्याने धावा काढत, मुंबई क्रिकेटच्या उज्ज्वल परंपरेचा मान राखला. एक पिता आणि एक गुरू म्हणून दिनेश लाड यांनी दोन्ही भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या. हजारो गरिबांच्या मुलांना मोफत मार्गदर्शन, राहण्याची सोय आणि योग्य क्रिकेटचे साहित्य पुरवणारे दिनेश लाड हे केवळ प्रशिक्षक नसून, ते अनेक खेळाडूंचे खर्या अर्थाने पालक झाले. त्यांच्या या निष्काम सेवेची दखल घेत, भारत सरकारने २०२२ मध्ये त्यांना क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अशा ‘द्रोणाचार्य पुरस्कारा’ने सन्मानित केले. मला आज आकाशवाणीच्या माध्यमातून लाड सरांचा हा प्रवास ऐकताना एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, इतके मोठे यश आणि रोहित-शार्दूलसारखे जागतिक कीर्तीचे शिष्य मिळूनही, दिनेश लाड यांच्यातील ‘राजू’ अजूनही अत्यंत विनम्र आहे. भारतीय क्रिकेटला समृद्ध करणार्या या ‘द्रोणाचार्या’ला ‘क्रीडाविश्व’तर्फे मनःपूर्वक धन्यवाद! वेल डन राजू सर, वेल डन!
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत)
लेखक- श्रीपाद पेंडसे