श्रीराम मंदिरातील दानचोरीप्रकरणी आरोपपत्राची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल!

स्थानिक न्यायालयात होणार पुढील सुनावणी; याचिकांचा देखील केला निपटारा

    02-Nov-2026   
 
 Shri Ram Temple Donation Theft Case
 
मुंबई (Shri Ram Temple Donation Theft Case) : अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या दानचोरी प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आरोपपत्र दाखल केले. उत्तर प्रदेश सरकारच्या या निवेदनाची सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दखल घेतली. या प्रकरणातील याचिकांचा निपटारा करताना स्थानिक न्यायालय या प्रकरणाची पुढील सुनावणी करेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
 
उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने उपस्थित असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाला सांगितले की, एसआयटीच्या तपासात मंदिरातील दानरकमेची मोजणी सुरू असताना ही चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही आरोपींनी चोरीच्या रकमेतून मालमत्ता खरेदी केली आहे, तर इतर काही आरोपींनी चोरीची रक्कम बँक खात्यांमध्ये जमा करून ठेवली. (Shri Ram Temple Donation Theft Case)
 
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारची ही निवेदने नोंदवून घेतली. तसेच, दानरकमेच्या चोरीची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांना श्रीराम मंदिरातील निधीच्या अपहारासंदर्भातील सुनावणीदरम्यान अयोध्येतील स्थानिक न्यायालयाला सहाय्य करण्याची परवानगी दिली. (Shri Ram Temple Donation Theft Case)
 
याचिकांचा निपटारा करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, राम मंदिरातील दानचोरी प्रकरणाच्या गुणदोषांबाबत न्यायालयाने कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. मुख्य अयोध्या वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, श्रीराम मंदिराचे बांधकाम त्याच जमिनीवर झाले आहे की नाही, हे निश्चित करण्याची मागणी करणाऱ्या नव्या याचिकेवर विचार करण्यासही न्यायालयाने नकार दिला.
 
यापूर्वी २१ सप्टेंबर रोजी श्रीराम मंदिरातील दानचोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने २५ सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी पहिले आरोपपत्र दाखल करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. (Shri Ram Temple Donation Theft Case)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर