"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताचे संरक्षक कवच!" पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांचे प्रतिपादन

    19-Nov-2026   
 
RSS India Protective Shield Governor Ravi
 
मुंबई (RSS India Protective Shield Governor Ravi) : संघाच्या शताब्दी वर्षात प्रमाणित तारखांच्या आधारे संकलित करण्यात आलेले हे पुस्तक पुढील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. ती सामान्य परिस्थिती नव्हती. भारताला अंतर्गत आणि राष्ट्रीय स्तरावर दुर्बल करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, अशा परिस्थितीतही संघाची स्थापना झाली. राष्ट्रसेवेचे व्रत घेऊन सुरू झालेला संघपरिवार आज शंभर वर्षांचा झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारताचे संरक्षक कवच आहे, असे प्रतिपादन पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी केले.
 
चाणक्य वार्ता प्रकाशन समूहाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या संकल्पनेवर आधारित ‘भारत गौरव उत्सव २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम नवी दिल्ली येथील सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर्स इन्स्टिट्यूटच्या सभागृहात पार पडला. पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक दिनेशचंद्र यांचेही यावेळी सान्निध्य लाभले. (RSS India Protective Shield Governor Ravi)
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलालजी म्हणाले की, संघाची इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. विजयादशमी हा केवळ एक सण नसून त्यामागे विजयाचा संकल्प आहे. संघाचे कार्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उद्योगपतीच्या बळावर चालत नाही, तर समाजाच्या पाठबळावर चालते. त्यामुळेच संघाला आज शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. जागतिक शांततेसाठी भारताचे सामर्थ्यवान होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. (RSS India Protective Shield Governor Ravi)
 
भय्याजी जोशी यांनी पुस्तकलेखन हे कठीण कार्य असल्याचे सांगितले. संघामुळेच आज समाजात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून आले आहे, असे ते म्हणाले. कितीही प्रयत्न केले तरी भारताला संपविणे कोणालाही शक्य नाही. कारण भारताची आंतरिक शक्ती अत्यंत मजबूत आहे. जागतिक स्तरावर भारताची प्रासंगिकता कायम राहणार आहे. भारताच्या या आंतरिक शक्तीचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
 
यावेळी वक्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा, संघविचारांचा, सामाजिक योगदानाचा आणि राष्ट्रनिर्मितीतील भूमिकेचा आढावा घेतला. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिथी दर्पण’ या पुस्तकाच्या माध्यमातून संघाच्या ऐतिहासिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण घटना आणि तारखांचे संकलन करण्याच्या प्रयत्नाचेही कौतुक करण्यात आले. (RSS India Protective Shield Governor Ravi)





ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर