‘देशातील अव्वल स्वच्छ शहरा’च्या यशाचे खरे प्रेरणास्थान वनमंत्री गणेश नाईक! उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते गौरव

    19-Nov-2026

Navi Mumbai Cleanest City Ganesh Naik Leadership
 
​नवी मुंबई (Navi Mumbai Cleanest City Ganesh Naik Leadership) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘देशातील सर्वात स्वच्छ शहर’ हा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेला मिळाल्यानंतर शहरात आनंदाचे वातावरण आहे. या गौरवामागे केवळ प्रशासनाचाच नव्हे, तर गृहिणी, व्यापारी, फेरीवाले, गृहनिर्माण सोसायटी, स्वच्छतादूत आणि सर्वसामान्य नागरिकांच्या ‘कर्तव्यपूजे’चा मोठा वाटा आहे. मात्र, या संपूर्ण लोकचळवळीचे खरे प्रेरणास्थान राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हेच आहेत, असे प्रतिपादन उपमहापौर दशरथ भगत यांनी केले. वाशी येथे आयोजित वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि पालिका प्रशासनाच्या वतीने नाईक यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना उपमहापौर दशरथ भगत शहराच्या यशाचे सामाजिक पैलू अधोरेखित केले.
 
​गणेश नाईक यांचा नवी मुंबईकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ प्रशासकीय नाही, तर एका पालकासारखा आहे. स्वच्छतेसोबतच पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, परिवहन, मलनिःसारण, कर वाढ न ठेवण्याचे धोरण आणि सामाजिक योजनांच्या माध्यमातून त्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच नागरी सुविधांमध्ये नवी मुंबईने देशात आघाडी घेतली आहे. असे भगत यांनी नमूद केले. (Navi Mumbai Cleanest City Ganesh Naik Leadership)
 
जगभरात स्वच्छतेबाबत जनजागृती सुरू असली, तरी नवी मुंबईत स्वच्छता ही केवळ मोहीम न राहता ती ‘कर्तव्यपूजा’ बनली आहे, शहराच्या स्वच्छतेचे ‘पालकत्व’ येथील नागरिकांनी आनंदाने स्वीकारले आहे. गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना, व्यापारी आणि फेरीवाल्यांच्या सक्रिय सहभागामुळेच हा टप्पा गाठता आला. यापुढे शहर अधिक स्वच्छ आणि सुगंधित करण्याचा मानस नाईक यांचा असून, जनसहभागाची ही चळवळ अधिक बळकट करून हा राष्ट्रीय सन्मान कायम राखण्यासाठी सर्वच घटक कटिबद्ध राहतील, असा विश्वास भगत यांनी व्यक्त केला. या यशात समाजातील अनेक घटकांचे योगदान असले, तरी सर्वांना एकत्र आणून प्रेरणा देणारे नेतृत्व वनमंत्री गणेश नाईक यांचेच आहे, अशी भावना भगत यांनी उपस्थितांच्या वतीने व्यक्त केली. (Navi Mumbai Cleanest City Ganesh Naik Leadership)





संबंधित मजकूर