चेन्नई (Massey Ferguson Micro Drama Series) : ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेडने (टीएएफई) मायक्रो-ड्रामा सिरीज ‘मिट्टी के मतवाले'च्या लाँचसह ग्राहक संवादाच्या नवीन आयामात पाऊल टाकले आहे. १९६० मध्ये चेन्नई, भारत येथे स्थापन झालेली ही प्रमुख भारतीय कंपनी जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक आणि विक्रीच्या प्रमाणात भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. टीएएफई दरवर्षी २ लाख १४ हजार हून अधिक ट्रॅक्टर्सची विक्री करते.
ही मोहीम टीएएफईच्या प्रतिष्ठित ट्रॅक्टर ब्रँड मॅसी फर्ग्युसनभोवती केंद्रित आहे आणि या शॉर्ट्स सिरीजच्या लाँचद्वारे ग्राहक संवादाचा नवा मार्ग खुला करण्यात आला आहे. मनोरंजनावर आधारित ब्रँड स्टोरीटेलिंगमधील हा टीएएफईचा पहिलाच प्रवेश आहे, ज्यामध्ये प्रभावी कथानक, आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा आणि ग्रामीण भारताचा उत्साह एकत्र आणला आहे. डिजिटल माध्यम आता कंटेंट पाहण्याचा अविभाज्य भाग बनला असल्याने या सिरीजमध्ये लहान आणि एकमेकांशी जोडलेल्या एपिसोड्ससह व्हर्टिकल, मोबाईल-फर्स्ट फॉरमॅटचा वापर करण्यात आला आहे. यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या दैनंदिन पाहण्याच्या सवयींना साजेसा फॉरमॅटमध्ये या कथेशी जोडले जाता येते, तसेच ब्रँडला अर्थपूर्ण आणि जवळच्या वाटणाऱ्या कथाकथनाद्वारे ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. (Massey Ferguson Micro Drama Series)
टीएएफई ओरिजिनल म्हणून सादर केलेल्या २८ एपिसोड्सच्या ‘मिट्टी के मतवाले' सिरीजमध्ये अभिनेता हार्दिक जोशी आर्याच्या मुख्य भूमिकेत आहे. या सिरीजचे कथानक अनपेक्षित कौटुंबिक संकटामुळे आपल्या गावी परतणाऱ्या एका तरुणाभोवती फिरते. गावी परतण्याचा हा प्रवास लवकरच त्याच्या वडिलांचे अपूर्ण स्वप्न, संपूर्ण गावाच्या महत्त्वाकांक्षा आणि त्याच्या धैर्याची व निष्ठेची परीक्षा घेणाऱ्या आव्हानांचा मोठा प्रवास बनतो. कुटुंब, महत्त्वाकांक्षा, नातेसंबंध आणि समुदाय या विषयांच्या माध्यमातून ही सिरीज ग्रामीण जीवनातील वास्तव, आकांक्षा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती टिपते, ज्यात मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर संपूर्ण सिरीजमध्ये खऱ्या सोबत्याची भूमिका बजावतो. (Massey Ferguson Micro Drama Series)
या उपक्रमामधून पारंपरिक ब्रँड संवादाच्या पलीकडे जाऊन ग्राहकांशी जोडले जाण्याचा टीएएफईचा दृष्टिकोन दिसून येतो. पिढ्यानपिढ्या मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर्स हे शेतकरी कुटुंबांचे महत्त्वाचे सदस्य राहिले आहेत, केवळ शेतीचे यंत्र म्हणून न राहता ते त्यांच्या उपजीविकेचा, अनुभवांचा आणि कौटुंबिक प्रवासाचा भाग बनले आहेत. ‘मिट्टी के मतवाले' हेच नाते अधिक दृढ करते आणि मॅसी फर्ग्युसनला केवळ स्वतंत्र उत्पादन म्हणून न दाखवता ग्रामीण जीवनाचा स्वाभाविक भाग म्हणून कथेत सादर करते. (Massey Ferguson Micro Drama Series)
‘मिट्टी के मतवाले'च्या माध्यमातून टीएएफई शॉर्ट-फॉर्म मीडियाच्या क्षमतेचा धाडसी शोध घेत आहे आणि ग्राहकांशी अधिक दृढ नाते निर्माण करण्यासाठी सध्याच्या डिजिटल ट्रेंड्सचा प्रभावी वापर करत आहे. हा उपक्रम कंपनीच्या आपल्या ग्राहकांना, त्यांच्या बदलत्या आवडीनिवडींना आणि त्यांचे जीवन घडवणाऱ्या सांस्कृतिक संदर्भांना समजून घेण्यावरील सातत्यपूर्ण लक्षालाही अधोरेखित करतो.
‘मिट्टी के मतवाले'चे स्ट्रीमिंग दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झाले आहे आणि मॅसी फर्ग्युसन इंडियाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर दररोज नवीन एपिसोड्स प्रदर्शित केले जात आहेत. ही सिरीज पाहण्यासाठी मोफत उपलब्ध आहे, जिथे सणासुदीच्या नियोजित कालावधीत हा संपूर्ण प्रवास उलगडत जाणार आहे. (Massey Ferguson Micro Drama Series)