विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत युवा शक्तीची भूमिका महत्त्वपूर्ण; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा.कार्यकारिणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांचे प्रतिपादन!

    19-Nov-2026   
 
Manmohan Vaidya Youth Developed India
 
मुंबई (Manmohan Vaidya Youth Developed India) : ‘विकसित भारत @२०४७’ हे ध्येय साकारण्यात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. युवा शक्ती ही कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती असते. युवकांची ऊर्जा, प्रतिभा, नवोन्मेष, ज्ञान, कौशल्य आणि राष्ट्राप्रती असलेली समर्पणाची भावना यांच्याच बळावर भारत विकसित, आत्मनिर्भर आणि जगाला मार्गदर्शन करणारे राष्ट्र बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.
 
संबलपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) येथे आयोजित विशेष बौद्धिक कार्यक्रमात ते युवकांना संबोधित करत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयआयएम संबलपूरचे संचालक प्रा. महादेव जायसवाल होते. यावेळी शिक्षण, संघटन, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. (Manmohan Vaidya Youth Developed India)
 
डॉ. मनमोहन वैद्य यांनी युवकांचे सामर्थ्य, शिक्षणाचा उद्देश, भारतीय जीवनमूल्ये, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रनिर्मितीतील युवकांचा सक्रिय सहभाग या विषयांवर आपले विचार मांडले. युवकांनी आपल्या वैयक्तिक यशाला राष्ट्रहिताच्या व्यापक उद्दिष्टांशी जोडावे. ज्ञान, कौशल्य, चारित्र्य आणि नवोन्मेष यांच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. (Manmohan Vaidya Youth Developed India)
 
ते म्हणाले, विकसित भारताची उभारणी केवळ आर्थिक प्रगतीतून शक्य नाही. त्यासाठी सामाजिक समरसता, सांस्कृतिक जाणीव, नैतिक मूल्ये, आत्मनिर्भरता आणि नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांप्रती जागरूकता असणेही आवश्यक आहे. युवा पिढीने या सर्व बाबी आत्मसात करून राष्ट्राच्या भविष्याच्या जडणघडणीत आपली भूमिका बजावली पाहिजे.
 
या कार्यक्रमाला शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. वैद्य यांच्या विचारांमधून युवकांना ‘विकसित भारत @२०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेशी जोडून सकारात्मक आणि रचनात्मक योगदान देण्याची प्रेरणा मिळाली. (Manmohan Vaidya Youth Developed India)




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर