मुंबई (Malabar Hill Construction Residents Protest) : मलबार हिल येथील वाळकेश्वर रोडवरील फियोनिका इमारतीलगत सुरू असलेल्या बांधकामावरून रहिवासी आणि संबंधित बांधकाम व्यावसायिक यांच्यात वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी इमारतीतील रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्यासह आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
इमारतीलगतच्या भूखंडावर सुरू असलेल्या बांधकामामुळे आपल्या मालमत्तेवर अतिक्रमण होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तसेच किनारपट्टी नियमन क्षेत्राच्या (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन, इमारतीची संरक्षक सीमाभिंत पाडणे आणि बांधकामाला विरोध केल्यामुळे धमकावले जात असल्याच्या तक्रारीही त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, परिसर, किनारपट्टी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आवाज उठविणाऱ्या रहिवाशांना धमकावले जात असल्यास ही गंभीर बाब असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा सांगितले. (Malabar Hill Construction Residents Protest)
तसेच या प्रकरणात रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच रहिवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्यासह आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले. (Malabar Hill Construction Residents Protest)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....