सोनिया गांधींनाही न्यायालयात खेचणार! सावरकरांच्या उल्लेखांवरून सात्यकी सावरकर आक्रमक

‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ पुस्तकातील मजकुराची करणार पडताळणी; तथ्यहीन आरोप किंवा ‘माफीवीर’ उल्लेख आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

    19-Nov-2026   
 
Satyaki Savarkar Sonia Gandhi Legal Warning
 
पुणे (Satyaki Savarkar Sonia Gandhi Legal Warning) : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह उल्लेखांवरून वाद निर्माण झाला आहे. या वादात आता सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. पुस्तकात सावरकर यांच्याविषयी तथ्यहीन किंवा संदर्भहीन आरोप आढळल्यास सोनिया गांधी यांच्याविरोधातही न्यायालयीन लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना सात्यकी सावरकर यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून ते कर्नाटकात आयोजित सावरकरविषयक कार्यक्रमात व्यस्त होते. सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह उल्लेखांची माहिती त्यांना मिळाली आहे; मात्र त्यांनी अद्याप पुस्तक वाचलेले नाही. आता पुस्तकातील संबंधित मजकुराची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Satyaki Savarkar Sonia Gandhi Legal Warning)
 
यापूर्वी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानांप्रकरणी सात्यकी यांनी मानहानीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकातही आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला. (Satyaki Savarkar Sonia Gandhi Legal Warning)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर