'रामायण'मुळे‘जनक’ला थिएटरचा अडथळा; आता प्रदर्शन थेट २०२७ मध्ये!Ramayana Sayali Sanjeev janak

    18-Nov-2026
 
janak
 
 
मुंबई - Ramayana Sayali Sanjeev janak मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी थिएटर मिळण्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जनक’ हा आगामी मराठी चित्रपट आता नियोजित तारखेला प्रदर्शित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 'रामायण'मुळेचित्रपटगृहांची उपलब्धता नसल्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट आता फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
आर. टी. बी. फिल्म्स प्रस्तुत आणि अभिषेक कंवर दिग्दर्शित ‘जनक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. मात्र, चित्रपटगृहांची उपलब्धता आणि प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे निर्मात्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून स्पष्ट केले आहे.Ramayana Sayali Sanjeev janak
‘जनक’सारखा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही निर्मात्यांनी म्हटले आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये हा चित्रपट अधिक भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा त्यांचा मानस आहे.‘जनक’ हा सत्यघटनेवर आधारित कोर्टरूम ड्रामा आहे. एका बापावर गंभीर आरोपांचे सावट येते आणि त्याच्या सन्मानासाठी त्याची मुलगी न्यायालयीन लढा देण्यासाठी उभी ठाकते, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती कथा आहे. Ramayana Sayali Sanjeev janak
चित्रपटात सायली संजीवसोबत अविनाश नारकर, सुरेश विश्वकर्मा, विनिता काळे, अनुष्का पिंपुटकर, ओंकार भसमे आणि प्रसाद ओझरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कंवर यांनी केले असून कथा, पटकथा आणि संवादलेखन ओंकार भसमे यांचे आहे.Ramayana Sayali Sanjeev janak
एकीकडे मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत असताना दुसरीकडे चित्रपटगृहांची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न बनत आहे. ‘जनक’च्या प्रदर्शन पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे मराठी चित्रपटांच्या प्रदर्शन नियोजनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.Ramayana Sayali Sanjeev janak
 




संबंधित मजकूर