मुंबई ( कपिल देशपांडे ) - Pravin Tarde Drought Nana Patekar महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अशा संकटाच्या काळात केवळ सरकार किंवा सामाजिक संस्थांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. कलाकार, साहित्यिक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर आणि उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींनीही ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली पाहिजे. त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना आधार देण्याची गरज आहे, असे परखड मत अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 'मुंबई तरुण भारत'ही बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्रातील विविध दुष्काळग्रस्त भागांना आपण भेटी दिल्याचे सांगताना तरडे म्हणाले, “मी सोलापूर, मराठवाडा, खानदेश, विदर्भातील काही गावांमध्ये तसेच मुळशी, भोर, वेल्हे आणि राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये फिरलो आहे. शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, नैसर्गिक संकट आणि त्यात भर पडलेला एकटेपणा या सगळ्या गोष्टी जवळून पाहायला मिळाल्या. माझ्या परीने जेवढे शक्य आहे तेवढी मदत करण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय.”Pravin Tarde Drought Nana Patekar
पुढे ते म्हणाले, “मी मराठवाड्यातला अभिनेता आहे, विदर्भातली अभिनेत्री आहे किंवा खानदेशचा दिग्दर्शक आहे, तर निदान आपण ज्या भागातून आलो आहोत, त्या भागातील चार-पाच गावांना तरी स्वतःहून भेट दिली पाहिजे. कुणाची वाट न पाहता छोटंसं आवाहन केलं पाहिजे. माझ्या आवाहनाला कैलासवाणी यांनी तातडीने प्रतिसाद दिला. एका मुलीच्या शिक्षणासाठी जवळपास दोन लाख रुपये आणि दुसऱ्या मुलीच्या पोलीस भरतीसाठी सव्वा लाख रुपयांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आपल्या छोट्याशा प्रयत्नातून एखाद्याचे शिक्षण वाचू शकते, एखाद्या कुटुंबाला आधार मिळू शकतो.”Pravin Tarde Drought Nana Patekar
*नाना पाटेकर यांच्यासारख्या मोठ्या माणसाची उणीव जाणवते!*
शेतकऱ्यांसाठी दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांनी केलेल्या कार्याची आठवण काढताना ते भावुक झाले. नाना पाटेकर आज असते तर शेतकऱ्यांसाठी त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा मोठा उपयोग झाला असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.Pravin Tarde Drought Nana Patekar
“काय रे, परमेश्वराच्या मनात काय असतं, हे आपल्याला कसं कळणार? खूप मोठा माणूस आपल्यातून गेला. नाना पाटेकर हे केवळ अभिनेते किंवा सुपरस्टार नव्हते, तर त्यापलीकडे जाऊन ते खूप मोठे माणूस होते. विशेषतः शेतकऱ्यांसाठी त्यांचे योगदान खूप मोठे होते. आज त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवत असल्याचं तरडे यावेळी म्हणाले.
Pravin Tarde Drought Nana Patekar
यावेळी मकरंद अनासपुरे यांच्यासह नीलकांती पाटेकर आणि मल्हार यांच्या शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. “नीलूताई आणि मल्हार या कामासाठी पुढे आले आहेत. ते उत्तम काम करतील. मात्र, आपणही आपल्या परीने या कार्यात सहभागी झाले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.Pravin Tarde Drought Nana Patekar
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने न पाहता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणे, हीच आजच्या काळाची गरज असल्याचे प्रवीण तरडे यांच्या भूमिकेतून स्पष्ट होतंय.Pravin Tarde Drought Nana Patekar