शेतकऱ्यांच्या हितासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतुदी करा; भारतीय किसान संघाची सात कलमी मागणी

    18-Nov-2026   

Bharatiya Kisan Sangh Budget Demands 2027-28
 
मुंबई (Bharatiya Kisan Sangh Budget Demands 2027-28) : भारतीय किसान संघाची दोन दिवसीय (१७ व १८ नोव्हेंबर) अखिल भारतीय कार्यकारिणी बैठक पंजाबमधील लुधियाना येथे पार पडली. या बैठकीत आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर यापूर्वी झालेल्या बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचना आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, भारतीय अॅग्रो इकॉनॉमिक रिसर्च सेंटर आणि एफपीओ माही फेडरेशन यांनी मांडलेल्या सूचनांची माहिती उपस्थितांसमोर ठेवण्यात आली.(Bharatiya Kisan Sangh Budget Demands 2027-28)
 
आगामी केंद्रीय अर्थसंकर्पाच्या संदर्भात भारतीय अॅग्रो इकॉनॉमिक रिसर्च सेंटरचे अखिल भारतीय अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अर्थसंकल्पपूर्व बैठकीत कृषी क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या सूचना मांडल्या. त्यामध्ये रासायनिक खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांना द्यावे, सर्व शेतकऱ्यांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ द्यावा, नैसर्गिक आपत्तींसाठी स्वतंत्र निधी स्थापन करावा, ग्रामीण भागातील गुंतवणुकीला कर सवलत द्यावी, शेतकऱ्यांना प्रतिएकर निश्चित आर्थिक मदत द्यावी, पीकविमा योजना सरकारने स्वतः राबवावी, कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवावी असे काही मुद्दे नमूद केले आहेत.(Bharatiya Kisan Sangh Budget Demands 2027-28)
 
या बैठकीत शेतकरी हिताच्या विविध मुद्यांवर गांभीर्याने विचारविनिमय करण्यात आला असून, आगामी अर्थसंकल्पात या मागण्यांचा सकारात्मक विचार व्हावा अशी अपेक्ष व्यक्त करण्यात आली आहे.
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर