मुंबई - Alia Bhatt Sharvari‘कोण होणार करोडपती’च्या या आठवड्यातील विशेष भागात बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्यासोबत हॉट सीटवर एक खास पाहुणी पाहायला मिळणार आहे. मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ या शोमध्ये हजेरी लावणार असून, ती माधुरी दीक्षितसोबत दिलखुलास गप्पा मारताना आणि आपल्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाचे अनुभव शेअर करताना दिसेल.
या विशेष भागात, गप्पांदरम्यान शर्वरीनं अभिनेत्री आलिया भट्टबद्दल असलेला तिचा आदर व्यक्त करताना चित्रपटामध्ये तिच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव किती खास होता, याबद्दल मनमोकळेपणानं बोलली. आलियाबद्दल बोलताना शर्वरी म्हणाली, “आलिया माझी सर्वात आवडती अभिनेत्री आहे. तिनं केलेले चित्रपट, पडद्यावर आणलेल्या कथा आणि तिनं साकारलेल्या भूमिका या सर्वच गोष्टी अत्यंत प्रेरणादायी आहेत. मला नेहमी असं वाटायचं की मी सुद्धा असेच चित्रपट करावेत. त्यामुळे आलिया माझ्यासाठी नेहमीच एक प्रेरणास्थान राहिलेली आहे. आणि जेव्हा मला समजलं की आम्ही एकत्र चित्रपट करणार आहोत, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. पण त्याहीपेक्षा, मला वाटलं की मी शांतपणे एका कोपऱ्यात बसून आलियाकडून जे काही शिकता येईल ते सर्व शिकून घ्यावं. एक माणूस म्हणून ती अप्रतिम आहे. ती स्वतःच लहान दिसते, पण तिला एक लहान मुलगी आहे. शॉट्सच्या मधल्या वेळेतही ती सतत पुढील गोष्टींचं नियोजन करत असते. आजूबाजूला काय सुरू आहे याची तिला पूर्ण जाणीव असते. टेक सुरू असताना तिचं संपूर्ण लक्ष कामावर असतं आणि त्यात ती आपलं शंभर टक्के देते, यासोबतच ती घर, तिचे ब्रँड्स आणि इतर सर्व गोष्टी उत्तमरीत्या सांभाळते. ती खरोखरच एक उत्तम ‘मल्टीटास्कर’ आहे.”Alia Bhatt Sharvari
आलियाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या या कौशल्याचं माधुरी दीक्षितनं ही कौतुक केलं. माधुरी म्हणाली, “वा! हे खूपच कौतुकास्पद आहे. ती केवळ एक उत्कृष्ट अभिनेत्रीच नाही, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींकडे बारकाईनं लक्ष देणारी व्यक्ती आहे.”Alia Bhatt Sharvari