
मुंबई (विशेष प्रतिनिधी )-Shahir Vitthal Umap mrudgandh भारूड, गोंधळ, पोवाडे अशा लोककलेच्या विविध अविष्कारांतून लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या दमदार आवाजाने, प्रभावी सादरीकरणाने आणि सामाजिक जाणिवांनी त्यांनी लोककलेला केवळ मनोरंजनाचे माध्यम न ठेवता जनजागृतीचे प्रभावी व्यासपीठ बनवले. त्यांच्या या अद्वितीय कलाप्रवासाला आणि समृद्ध वारशाला अभिवादन करण्यासाठी पुन्हा एकदा सुरांची मैफल सजणार आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृतिदिनानिमित्त १६वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० वा.राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे हा सांगीतिक आणि सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे.
कलेच्या विविध क्षेत्रांत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवणाऱ्या कलावंतांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी ‘मृद्गंध पुरस्कार’ प्रदान केला जातो. यंदाही मान्यवर कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेले आकर्षक मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.Shahir Vitthal Umap mrudgandh
यंदाच्या 'मृद्गंध पुरस्कार २०२६’ पुरस्काराचे मानकरी पद्मश्री तालयोगी श्री सुरेश तळवलकर (जीवनगौरव), पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा (लोककला क्षेत्र), पद्मश्री सुधारक ओळवे (छायाचित्रण आणि पत्रकारिता), संदेश कुलकर्णी (अभिनय व दिग्दर्शन क्षेत्र), अभिनेत्री अमृता सुभाष (अभिनय क्षेत्र), चैतन्य देवडे (माऊली) (नवोन्मेष प्रतिभा- गायक) ही मान्यवर मंडळी आहेत.Shahir Vitthal Umap mrudgandh
या बाबत बोलताना लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव, प्रसिद्ध गायक आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप म्हणाले, “लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळख आहे. बाबांनी आपल्या कलेतून सर्वसामान्य माणसाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. रसिकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं आणि तेच प्रेम आज आम्हालाही मिळत आहे. बाबांचा लोककलेचा वारसा जपतानाच नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे, हेच आमचे ध्येय आहे.” आणि याचं भावनेतून या वर्षी विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे दुष्काळग्रास्त शेतकर्यांना मदतीचा हाथ दिला जाईल.Shahir Vitthal Umap mrudgandh
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.Shahir Vitthal Umap mrudgandh