रायगड किल्ला: साक्षी क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान

रायगड किल्ला स्वच्छता अभियानाद्वारे दहिसरच्या साक्षी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश दिला.

    17-Nov-2026

raigad-sakshi-classes-news-696x350

मुंबई : साक्षी क्लासेस यांच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, रायगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि स्वराज्याची प्रेरणा प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणे हा होता. यासाठी अनुभवी मार्गदर्शकांची (गाईड) व्यवस्था करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांसह पालकांनीही या सहलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. इतिहासाची माहिती जाणून घेतल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान साक्षी क्लासेसच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला. ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले आणि पर्यटनस्थळांचे सौंदर्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश या माध्यमातून देण्यात आला. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्वच्छतेची सवय आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न साक्षी क्लासेसने केला. ‘इतिहासाचा अभिमान आणि स्वच्छतेचे भान’ या विचाराची सुंदर सांगड या सहलीतून घालण्यात आली.







संबंधित मजकूर