मुंबई - Eetha Shraddha Kapoor संगीताचा ठेका, लावणीचा जलवा आणि अदांचा भन्नाट तडका… मॅडॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन्स यांनी त्यांच्या आगामी एपिक म्युझिकल ड्रामा ‘ईठा’मधील पहिलं गाणं ‘जी जी रे जी’ प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. या गाण्यातील श्रद्धाच्या ठसकेबाज लावणीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
गाण्यात श्रद्धा कपूर ‘ईठा’च्या भूमिकेत दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी गाण्याचे बोल लिहिले असून श्रेया घोषालने आपल्या सुरेल आवाजाने त्यात रंग भरले आहेत. तर वैभवी मर्चंटच्या जबरदस्त कोरिओग्राफीवर श्रद्धा आपल्या नजाकतदार अदांनी, भन्नाट नृत्याने अक्षरशः महफिल लुटली आहे. ‘जी जी रे जी’ हे केवळ एक गाणं नसून ताकद, जिद्द आणि एका कलाकाराच्या लिजेंड बनण्याच्या प्रवासाचा सुरेल उत्सव आहे.Eetha Shraddha Kapoor ‘ईठा’साठी संगीत तयार करण्याच्या अनुभवाबद्दल अजय-अतुल सांगतात, “ईठासारख्या चित्रपटात संगीत केवळ बॅकग्राऊंडला वाजून चालणार नाही. ते व्यक्तिरेखेचा, तिच्या जगाचा आणि कथेतील भावनांचा एक भाग असणं गरजेचं होतं. प्रेक्षकांनी रंगमंचावर ईठाला जे पाहिलं, त्यापलीकडे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. ती प्रचंड ताकद, नजाकत आणि जिद्द असलेली कलाकार होती. ‘जी जी रे जी’च्या माध्यमातून तिची ही ताकद प्रभावी, करिश्माई आणि सिनेमॅटिक पद्धतीने मांडण्याचा आमचा प्रयत्न होता, मात्र त्याचवेळी लावणीचा पारंपरिक बाजही जपायचा होता.Eetha Shraddha Kapoor श्रद्धा कपूरसाठी ईठाच्या दुनियेत प्रवेश करणं हे आव्हानात्मक असलं, तरी तिने हा अनुभव मनापासून एन्जॉय केला. याबद्दल ती सांगते, “ईठाच्या भूमिकेत ‘जी जी रे जी’वर परफॉर्म करणं माझ्यासाठी खूपच रोमांचक अनुभव होता. लावणीमध्ये एक वेगळीच जादू आहे. तिची लय, हावभाव, ऊर्जा आणि प्रेक्षकांशी जोडून घेण्याची ताकद खरोखरच कमाल आहे. एका दिग्गज कलाकाराच्या अद्भुत विश्वात या गाण्याच्या माध्यमातून प्रवेश करताना मला जितका आनंद झाला, तितकीच मनात थोडी धाकधूकही होती. या गाण्यामागे एक खूप प्रभावी कथा आहे, कारण ते त्या महान कलाकाराच्या आयुष्यातील एका महत्त्वपूर्ण वळणाचं प्रतीक आहे. ही कथा गाण्यातून जिवंत करण्यासाठी आम्ही घेतलेली मेहनत प्रेक्षकांनाही जाणवेल, अशी आशा असल्याचं तिने सांगितलं.Eetha Shraddha Kapoor