मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : Chitrapataka Marathi Film Festival om raut pravin tardeभारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळणाऱ्या वाढत्या संधी, चित्रपट निर्मितीतील भव्यतेचे बदलते स्वरूप, हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळाच्या आठवणी आणि नृत्यदिग्दर्शनातील सर्जनशीलता अशा विविध विषयांनी ‘चित्रपताका–२०२६’ या मराठी चित्रपट महोत्सवाचा तिसरा दिवस रंगला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओम राऊत, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, ‘आजचा मराठी सिनेमा’ या परिसंवादात सुहृद गोडबोले, अमृता राव, दिग्पाल लांजेकर, आदित्य सरपोतदार आणि प्रवीण तरडे यांच्या विशेष संवादसत्रांनी आणि कार्यशाळेने महोत्सवाला वेगळी उंची मिळवून दिली. चित्रपटसृष्टीतील अनुभव, बदलते व्यावसायिक गणित आणि कलात्मक प्रक्रियेचे विविध पैलू या निमित्ताने उलगडले.
‘भव्य सिनेमा साकारताना...’ या विषयावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओम राऊत यांची विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारतीय चित्रपटांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्माण झालेल्या नव्या संधींकडे लक्ष वेधताना ओम राऊत म्हणाले की, पूर्वी भारतीय चित्रपट परदेशातील काही ठरावीक ठिकाणीच प्रदर्शित होत असत. मात्र, आज जगभरातील विविध देशांमध्ये भारतीयांची वाढती उपस्थिती आणि विविध क्षेत्रांतील त्यांचे स्थान यामुळे भारतीय चित्रपटांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची दारे अधिक व्यापक झाली आहेत.भव्य चित्रपट साकारण्यासाठी केवळ मोठे बजेट पुरेसे नसते, तर चित्रपटाचा विषय, त्याची प्रभावी मांडणी, प्रदर्शनाची योग्य वेळ आणि सक्षम वितरण व्यवस्था या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.Chitrapataka Marathi Film Festival om raut pravin tarde
‘क्वीन ऑफ द कॉमेडी... गप्पा शुभा खोटेंशी!’ या विशेष मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी आपल्या सात दशकांच्या चित्रपट कारकिर्दीतील अनेक रंजक आठवणींना उजाळा दिला.आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या अपघाताची आठवण सांगताना शुभा खोटे यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. सायकलवरून जात असताना झालेल्या अपघातामुळे आपला पहिलाच चित्रपट शेवटचा ठरणार की काय, अशी भीती त्या वेळी वाटू लागली होती, असे त्यांनी मिश्किलपणे सांगितले. वडिलांना खेळाची विशेष आवड असल्याने त्यांनी आपल्याला कधीही खेळांपासून रोखले नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे निरीक्षण, त्यांच्याकडून मिळालेले संस्कार आणि शिकवण यांचा आपल्या जडणघडणीत मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.Chitrapataka Marathi Film Festival om raut pravin tarde
‘आजचा मराठी सिनेमा’ या विशेष परिसंवादातून मराठी चित्रपटसृष्टीच्या वर्तमान आणि भविष्याशी संबंधित विविध मुद्द्यांना हात घातला.या चर्चेत सुहृद गोडबोले, अमृता राव, दिग्पाल लांजेकर, आदित्य सरपोतदार आणि प्रवीण तरडे सहभागी झाले. या परिसंवादातील दिग्पाल लांजेकर, आदित्य सरपोतदार आणि प्रवीण तरडे यांसारख्या दिग्दर्शकांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. ऐतिहासिक विषयांची मांडणी, मनोरंजनप्रधान कथाकथन, सामाजिक वास्तव आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे सिनेमॅटिक प्रयोग अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या दिग्दर्शकांचे अनुभव या चर्चेला वेगळा संदर्भ देणारे ठरले.मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट निर्माण होत आहेत. ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, रहस्यमय तसेच प्रायोगिक विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहेत. नव्या पिढीतील दिग्दर्शक वेगवेगळे प्रयोग करत आहेत, तर अनुभवी दिग्दर्शकही आपल्या चित्रपटांमधून नवे विषय आणि वेगळी मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या मराठी सिनेमाची नेमकी दिशा काय असावी, यावर परिसंवादात चर्चा केंद्रस्थानी होती.Chitrapataka Marathi Film Festival om raut pravin tarde
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांच्या ‘नृत्याची भाषा’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत त्यांनी चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनाचे विविध पैलू उलगडून सांगितले. चित्रपटातील गाणे प्रभावीपणे पडद्यावर साकारण्यासाठी केवळ नृत्यकौशल्य पुरेसे नसते, तर संगीत, शब्द, ताल, कलाकारांच्या हालचाली आणि कॅमेऱ्याचा योग्य समन्वय साधणे आवश्यक असते. नृत्यदिग्दर्शकाचे काम केवळ कलाकारांना नाच शिकवण्यापुरते मर्यादित नसून, संपूर्ण गाण्याला दृश्यात्मक स्वरूप देण्याचे असते, असे प्रतिपादन त्यांनी केले.या कार्यशाळेत फुलवा खामकर यांनी ‘वाजले की बारा’ हे गाणे दाखवून त्यातील सादरीकरण आणि नृत्यदिग्दर्शनाचे बारकावे प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगितले.Chitrapataka Marathi Film Festival om raut pravin tarde