मुंबई : Chitrapataka 2026 marathi मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण विषय, नव्या कलाकृती, ज्येष्ठ कलाकारांच्या अनुभवांची शिदोरी आणि चित्रपटविषयक चर्चासत्रे अशा विविध उपक्रमांनी ‘चित्रपताका–२०२६’ या मराठी चित्रपट महोत्सवाचा दुसरा दिवस रंगतदार ठरत आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये हा चार दिवसीय महोत्सव सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित या महोत्सवात दुसऱ्या दिवशी अनेक मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, विशेष मुलाखती, परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.Chitrapataka 2026 marathi
दिवसाची सुरुवात ‘घरत गणपती’, ‘श्री गणेशा’ आणि ‘गारुड’ या चित्रपटांच्या प्रदर्शनाने झाली. त्यानंतर ‘सांगते ऐका’, ‘सांगळा’ आणि ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’ या चित्रपटांचे प्रदर्शन नियोजित होते.Chitrapataka 2026 marathi
ग्रामीण महाराष्ट्रातून पुढे आलेले नवे दिग्दर्शक, त्यांचे वेगळे कथाविषय, चित्रभाषा आणि मराठी सिनेमातील नव्या संधी यावर या परिसंवादात विचारमंथन आयोजित करण्यात आले.Chitrapataka 2026 marathi
मराठी चित्रपटांमधील स्त्रीप्रतिमेचा बदलता प्रवास, अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख आणि बदलत्या काळातील स्त्री व्यक्तिरेखा या विषयांवर विशेष चर्चा आयोजित करण्यात आली. अभिनेत्री अलका कुबल, वर्षा उसगांवकर, छाया कदम, सायली संजीव आणि प्राजक्ता माळी यांचा या चर्चेत सहभाग नियोजित होता. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील अनुभव सांगताना अभिनेत्रीची ओळख केवळ तिच्या सौंदर्यावरून ठरवली जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या यावेळी म्हणाल्या की, सुरुवातीला मला श्रीमंत वडिलांची मुलगी अशा स्वरूपाच्या भूमिका दिल्या जात असत. लोक माझ्या दिसण्याचे कौतुक करायचे आणि सुरुवातीला त्याचा आनंदही वाटत असे. मात्र, कालांतराने प्रेक्षकांनी केवळ सौंदर्याकडे न पाहता माझ्या अभिनयाचेही कौतुक करावे, असे मला वाटू लागले. आपल्या दिसण्यापेक्षा अभिनय आणि कामाच्या गुणवत्तेवरून आपली ओळख निर्माण व्हावी, ही इच्छा होती, असे सांगत पारंपरिक चौकटींपलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रवास त्यांनी यावेळी मांडला.Chitrapataka 2026 marathi
चित्रपट केवळ दृश्य माध्यम नसून त्यातील ध्वनी, संगीत, पार्श्वसंगीत आणि शांततेचाही कथनात महत्त्वाचा वाटा असतो. याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून मंदार कमलापूरकर यांच्या ‘स्वर-नाद-निनाद : समजून घेऊ या सिनेमाचे ध्वनी-संगीत!’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.Chitrapataka 2026 marathi
चित्रपटातील ध्वनींचा वापर, प्रसंगानुरूप संगीताची निवड, वातावरणनिर्मिती आणि प्रेक्षकांच्या भावनांवर ध्वनीचा होणारा परिणाम अशा तांत्रिक आणि कलात्मक बाबींचा या कार्यशाळेतून परिचय करून देण्याचा उद्देश होता.Chitrapataka 2026 marathi
यावेळी ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकर यांची ‘हाच माझा मार्ग...’ ही विशेष मुलाखत चर्चेचा विषय ठरला..Chitrapataka 2026 marathi
बालकलाकार म्हणून सुरू झालेला प्रवास, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभव, अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात केलेले काम, तसेच बदलत्या काळानुसार चित्रपटसृष्टीत झालेले बदल अशा अनेक पैलूंवर या मुलाखतीत संवाद साधण्याचे नियोजन होते.Chitrapataka 2026 marathi
विशेष म्हणजे वेगवेगळ्या काळातील आणि वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट एकाच महोत्सवात पाहण्याची संधी मिळणे हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. नव्या पिढीला मराठी सिनेमाचा वारसा समजून घेता यावा, तसेच जुन्या आणि नव्या चित्रपटांमधील अभिव्यक्तीतील बदल अनुभवता यावेत, या दृष्टीने ही चित्रपटांची निवड महत्त्वाची आहे.Chitrapataka 2026 marathi