जिनिव्हात महाराष्ट्राचा डंका; एमएसआरडीसीचे एमडी अनिलकुमार गायकवाड करणार भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व!


Anilkumar Gaikwad Geneva Conference
 
मुंबई, (Anilkumar Gaikwad Geneva Conference) : महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब ठरणारी कामगिरी म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार बी. गायकवाड हे जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय रस्ते महासंघाच्या परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या (आयआरएफ) इंडिया चॅप्टरचे अध्यक्ष म्हणूनही ते या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
  
दि. १६ ते दि. १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी, रस्ते विकास क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. जागतिक स्तरावर रस्ते व वाहतूक व्यवस्थेचे बदलते स्वरूप, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधांच्या विकासातील नव्या संकल्पना आणि भविष्यातील आव्हाने यावर या परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे.(Anilkumar Gaikwad Geneva Conference)
 
शाश्वत रस्ते विकास, वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजनांवर या परिषदेत विचारमंथन होणार आहे. विविध देशांनी रस्ते विकास क्षेत्रात केलेले प्रयोग, यशस्वी मॉडेल्स आणि तांत्रिक अनुभवांची देवाणघेवाणही यानिमित्ताने होणार आहे.
 
भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी गायकवाड यांच्याकडे आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय रस्ते विकास क्षेत्रातील अनुभव आणि क्षमतांना अधोरेखित करण्याची संधी मिळणार आहे. तसेच जागतिक स्तरावरील आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासाच्या नव्या संकल्पना भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण मानली जात आहे.(Anilkumar Gaikwad Geneva Conference)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर