'रामायणम' ठरला परदेशी बाजारपेठेत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट !
16-Nov-2026

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) -Ramayana Ranbir Kapoor yash नितेश तिवारी यांचा भव्य चित्रपट 'रामायण: भाग १' बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास घडवत आहे. रणबीर कपूर आणि यश यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत असून, दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. अत्यंत कमी कालावधीत, या चित्रपटाने जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या ५ भारतीय चित्रपटांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.रामायणम' परदेशी बाजारपेठेत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट ठरला आहे.
'रामायण' सुमारे ४,००० कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चातून हा चित्रपट दोन भागांत तयार करण्यात आला आहे. केवळ पहिल्या भागासाठी अंदाजे २,००० कोटी रुपयांचा खर्च आला असावा असे मानले जात आहे, तर काही अहवालांनुसार हा खर्च १,५०० ते १,८०० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे.Ramayana Ranbir Kapoor yash
रणबीर कपूर अभिनीत या चित्रपटाने दुसऱ्या रविवारी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रविवारी २३,५७३ शोजच्या माध्यमातून या चित्रपटाने ७५.०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशांतर्गत स्तरावर या चित्रपटाचे एकूण कमाई ९०९.०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर नेट कलेक्शन ७६०.६० कोटी रुपये झाले आहे. रविवारी, या चित्रपटाने भारताबाहेर ४०.०० कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंतची याची एकूण परदेशी कमाई सुमारे ४७५.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यासह, त्याने 'धुरंधर २' या चित्रपटाच्या ४३८.०० कोटी रुपयांच्या परदेशी कमाईचा विक्रम मागे टाकला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात एकूण १,३८४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'दंगल' चित्रपटाची कमाई वगळता, 'रामायणम' हा चित्रपट आता परदेशी बाजारपेठेत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.Ramayana Ranbir Kapoor yash
आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटाने केवळ चीनमध्येच ऐतिहासिक कमाई केली, जी सुमारे १,३०० कोटी ते १,३०५ कोटी रुपयांच्या घरात होती. चीनमध्ये या चित्रपटाची सुमारे ४ कोटी ३१ लाख तिकिटे विकली गेली होती.Ramayana Ranbir Kapoor yash