मुंबई (विशेष प्रतिनिधी ) :Chitrapataka Film Festival 2026 सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘चित्रपताका-२०२६’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वाचे उदघाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. ‘बंधू’ या सिनेमाचे प्रदर्शनाने या चार दिवसीय महोत्सवाचा प्रारंभ झाला असून महोत्सवात ३३ सिनेमे आणि १५ हून अधिक संवादसत्रांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव संपन्न होणार आहे..
उद्घाटन सोहळ्याला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महोत्सव संचालक पुरुषोत्तम बेर्डे, प्रभात चित्र मंडळाचे अध्यक्ष किरण शांताराम, उद्घाटकीय सिनेमा असलेल्या ‘बंधू’ चित्रपटातील कलाकार जितेंद्र जोशी, उपेंद्र लिमये यांच्यासह अलेक्झांडर माक्सुको (बेलारूस), फर्झाना अहमद चौधरी (बांगलादेश), पीअर स्टिवरलिंक (बेल्जिअम), कुईन जी (चीन), झिपोर झामा (दक्षिण आफ्रिका), दहलिया तबकोल (इजिप्त), वू थी टू (व्हिएतनाम), महम्मद कुर्निया वान (इंडोनेशिआ), मिस ऑड्रिना विलानोएवा बेसरल (मेक्सिको), मिस प्रियांका (श्रीलंका) आदी देशांचे दुतावास अधिकारी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.Chitrapataka Film Festival 2026
यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी चित्रपताका महोत्सवामागील शासनाची भूमिका मांडली. राज्य शासन चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून चित्रपटकर्मींना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच मराठी चित्रपटांनी सातत्याने अनवट विषय हाताळले, वेगळे प्रयोग केले आणि प्रतिकूल परिस्थितीतही दर्जेदार कलाकृतींची निर्मिती केली, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या जिद्दीचे विशेष कौतुक केले. कोविड काळात निर्माण झालेल्या चित्रपटांना राज्य शासनाने विशेष अनुदान देऊन प्रोत्साहन दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
Chitrapataka Film Festival 2026
सांस्कृतिक संवादाच्या दृष्टीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र व देशाच्या कला-संस्कृती-परंपरेची ओळख दृढ करण्यासाठी मराठी सिनेमा महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. त्यादृष्टीने याप्रसंगी उपस्थित विविध देशांतील दूतावास अधिकाऱ्यांना त्यांनी मराठी सिनेमाला त्यांच्या देशात अवकाश उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केले.
मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुढील तीन वर्षांत बेस्टच्या वाणिज्य विकासासाठी उपलब्ध जागांचा उपयोग मराठी सिनेमांसाठी विशेष चित्रपटगृहे उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.Chitrapataka Film Festival 2026
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या संवेदनशील व विचारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात दिवंगत अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या योगदानाचे स्मरण केले. चित्रपट महोत्सवांनी आपल्या कलात्मक जडणघडणीत बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख करत समीक्षकांनी केलेले कौतुक, दिलेले प्रोत्साहन आणि त्यातून मिळालेली कलात्मक ऊर्जा यामुळे कलाकार म्हणून आपली वाटचाल समृद्ध झाल्याची भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.Chitrapataka Film Festival 2026
महोत्सवासाठी नोंदणी शुल्कातून जमा होणारी संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार असल्याचेही व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी यावेळी सांगितले..Chitrapataka Film Festival 2026