गणेशपूरीत भाविक व नागरिकांनी उभारली भगवान नित्यानंद समाधी मंदिर कमान; माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून उद्घाटन!

    15-Nov-2026   
 
Ganeshpuri Bhagwan Nityananda Samadhi Temple Arch
 
कल्याण (Ganeshpuri Bhagwan Nityananda Samadhi Temple Arch) : गणेशपूरी येथील ग्रामस्थ व भाविकांनी पुढाकार घेऊन जमविलेल्या निधीतून भगवान नित्यानंद समाधी मंदिर व गरम पाण्याची पवित्र कुंडांकडे जाणाऱ्या रस्त्यावर कमान उभारली आहे. या कमानीचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले.
 
भगवान नित्यानंद समाधी मंदिर व गरम पाण्याच्या पवित्र कुंडाच्या परिसराला हजारो भाविकांची गर्दी होत असते. नव्याने येणाऱ्या भाविकांना माहितीसाठी मंदिर व गरम पाण्याच्या कुंडांकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वागत कमान उभारण्याची मागणी केली जात होती. मात्र, त्यासाठी गणेशपूरी ग्रामपंचायतीकडे तरतूद नसल्यामुळे, नागरिक व भगवान नित्यानंदांच्या भाविकांनी पुढाकार घेतला. गणेशपूरीतील ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. त्यानंतर स्वागत कमान उभारली गेली. (Ganeshpuri Bhagwan Nityananda Samadhi Temple Arch)
 
माजी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांच्या हस्ते रविवारी कमानीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे, गणेशपूरी, वज्रेश्वरी आणि अकलोलीचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गणेशपूरी ग्रामस्थांनी एकत्र येऊन उभारलेल्या स्वागत कमानीबद्दल कपिल पाटील यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. (Ganeshpuri Bhagwan Nityananda Samadhi Temple Arch)
 
 
 
 




संबंधित मजकूर