चांदिवलीत सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा! जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात विविध समाजांची एकजूट; प्रशासनाला १० दिवसांचा अल्टिमेटम

    15-Nov-2026   
Chandivali Hindu Community Protest
 
मुंबई (Chandivali Hindu Community Protest) : चांदिवली येथील संघर्ष नगरमध्ये रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात विविध सामाजिक समुदायांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत एका कुटुंबासोबत घडलेल्या जबरदस्तीच्या धर्मांतराच्या प्रयत्नाचा निषेध नोंदवला आणि आपला आवाज बुलंद केला.
 
या आंदोलनात सहभागी झालेल्या विविध समाजांच्या प्रतिनिधींनी सदर प्रकरण गांभीर्याने घेत संबंधित प्रशासन व पोलीस विभागाकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. सर्व समाजांच्या वतीने शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. (Chandivali Hindu Community Protest)
 
आंदोलनादरम्यान प्रतिनिधींनी प्रशासनाला १० दिवसांची मुदत देत या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्रात लागू असलेल्या नवीन धर्मांतर नियंत्रण कायद्यातील तरतुदींनुसार, चौकशीत गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
 
आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, येत्या १० दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास महाराष्ट्र स्तरावर व्यापक आंदोलन छेडण्यात येईल तसेच भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येईल. यावेळी उपस्थित वक्त्यांनी सांगितले की, कोणत्याही व्यक्तीवर किंवा कुटुंबावर दबाव, प्रलोभन अथवा जबरदस्ती करून धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न हा कायद्यानुसार चौकशीचा विषय आहे. अशा प्रकरणांमध्ये निष्पक्ष चौकशी होणे, पीडित कुटुंबाला न्याय मिळणे आणि आरोप सिद्ध झाल्यास दोषींना कठोर कायदेशीर शिक्षा होणे आवश्यक आहे. (Chandivali Hindu Community Protest)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर