दिवाळी आणि लाहोर

    13-Nov-2026   

Lahore Pollution 
 
पाकिस्तानच्या लाहोरची जगातील प्रथम क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून नुकतीच घोषणा करण्यात आली. तिथल्या राजकारण्यांनी यावर म्हटले की, "भारतात दिवाळीत फटाके फोडतात, ते सगळे प्रदूषण वार्‍याबरोबर उडतउडत लाहोरमध्ये आले आणि त्यामुळे लाहोरमध्ये प्रदूषण वाढले, नाहीतर लाहोर खूपच चांगले आहे.” खरेच पाकिस्तान्यांचे लाहोर खूप चांगले आहे का? याच लाहोरमध्ये दोन युरोपियन तरुणींवर सामुदायिक बलात्कार केल्याप्रकरणी नुकतेच पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि विदेश मंत्री इशाक दार यांचा नातू रजा दार याच्यासह सातजणांना अटक झाली आहे. याबाबत पाकिस्तानी नेते काय म्हणतात? की यालाही आता भारतच कारणीभूत? यावर वाटते की, मुस्लीम लांगूलचालनात आघाडीवर असलेल्या काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे म्हणणे, ‘पाकिस्तान्यांना माहिती आहे की नाही की, हिंदूंची दिवाळी म्हणजे मोठी ईद असते.’
 
असो. विषयांतर झाले; पण सामुदायिक बलात्काराच्या घटनेने उपपंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीच्या नातवाचे बलात्कार आणि ‘क्रिप्टो करन्सी’चे धंदेही उघड झाले. पाकिस्तानचे राजकारण सध्या तापले आहे. समाजकारण तापण्याचा प्रश्न येत नाही. कारण, बालकांसह महिला आणि पुरूषांचेही लैंगिक शोषण होणे हे तीथे नेहेमीचे असावे. याला पुष्टी देणारी एक घटना. पाकिस्तानी इस्लामिक उपदेशक मुफ्ती तारिक मसूद हा बालविवाहाचा समर्थक आहे. त्याने नुकतेच म्हंटले की कुणाला १६ वर्षाची वधू मिळत नसेल तर तो आठ-आठ वर्षाच्या दोन किंवा चार-चार वर्षाच्या चार मुली वधू म्हणून उपलब्ध करू शकतो. तर अशा घाणेरड्या विकृत मानसिकतेच्या लोकांचा पाकिस्तान!
 
याच परिप्रेक्ष्यात या रजा दारच्या घटनेचा मागोवा घेऊ. २०२५ सालच्या जून महिन्यात नेदरलॅण्ड्सची स्टेफनी अदनाना माउ-अरुण आणि व्हेनेझुएलाची एस्ट्रिड रॉबिन्सन बाराचो या दोघींची ओळख रजा दार याच्याशी सिंगापूर येथे झाली होती. तेव्हा या दोन युवतींनी त्याच्याशी ‘क्रिप्टो करन्सी’मध्ये पैसे गुंतवण्यासंबंधी चर्चा केली. चांगला फायदा होईल, असेही सांगितले. रजा दारने या दोघींच्या म्हणण्यानुसार पैसेही गुंतवले. सुरुवातीला त्याला चांगला परतावा मिळाला. त्याने आणखीन फायदा व्हावा, यासाठी पाच लाख डॉलरपेक्षा जास्त पैसे गुंतवले. त्यानंतर या तरुणींनी याला टाळायला सुरुवात केली. आपण फसलो गेलो, असे रजाला वाटले. मग त्याने त्या तरुणींशी पुन्हा संपर्क साधला आणि सांगितले की, पाकिस्तानमध्ये काही श्रीमंत लोक आहेत, त्यांना पैसे गुंतवायचे आहेत. रजाने या तरुणींना विश्वास वाटेल, अशी परिस्थिती निर्माण केली. या दोघीजणी पाकिस्तानमध्ये आल्या. रजा दारने त्यांना लाहोरच्या ‘डिफेन्स हाऊसिंग ऑथोरिटी’ परिसरातील एका घरात आमंत्रित केले. त्या तिथे आल्याबरोबर रजा दारने त्यांना बंधक बनवलेे. त्यांना जीवाचा धाक दाखवत त्यांच्याकडून तब्बल १९ हजार ५०० डॉलर वसूल केले. या महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर तिथे सामुदायिक बलात्कार आणि मारहाण केली गेली. पुढे अपराधी या दोघींना घेऊन लाहोर विमानतळाकडे जात असतानाच, त्यांच्या गाडीचा अपघात झाला. याचा फायदा घेत गर्दीतून या महिला पळून गेल्या. त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. तिथून त्या त्यांच्या देशात तत्काळ रवाना झाल्या. या सगळ्या घटनेत रजा दार आणि त्याचे साथीदार गुन्हेगार आहेत, तशाच या महिलाही फसवणूक करणार्‍या आहेतच. पण, मुख्य गोष्ट ही आहे की, अन्नान्न दशा असलेल्या पाकिस्तानमध्ये ‘क्रिप्टो करन्सी’त लाखो डॉलर्स गुंंतवण्यासाठी उपपंतप्रधानांच्या नातवाकडे एवढा पैसा आला कुठून?
या अशा परिस्थितीमध्ये रजा दार किंवा त्याचे आजोबा उपपंतप्रधान इशाक दार म्हणतात की, हे सगळे खोटे आहे आणि त्यांना फसवण्यासाठी हे सगळे सुरू आहे.
 
मात्र एकंदर पाकिस्तानचा इतिहास पाहता, पुढे पुराव्याअभावी किंवा बनावट कारणांनी रजा दार सुटून परदेशात पुन्हा मजा मारायला मोकळा होईल. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या जनतेचे काय? ती कौमी जनता काय करणार? तर, गरिबीत खितपत पडलेले हे पाकिस्तानी हिंदुस्थानातील काफिरांविरोधात जिहाद करायला आणखीन जोमाने कसे उतरतील, याची तजवीज पाकिस्तानचे नेते आणि धर्मांध लोक करतच राहणार आणि हो, भारतातले हिंदू दिवाळी साजरी करतात म्हणून, लाहोर जगात क्रमांक एकचे प्रदूषित शहर झाले, असे म्हणत राहणार. मूर्ख निर्लज्जांकडून आणखी काय अपेक्षा करायची?
९५९४९६९६३८
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर