मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्याच्या पक्षिवैभवात आणखी एका पक्ष्याची भर पडली आहे (ratnagiri district). जिल्ह्यातून प्रथमच राखी डोक्याचा बुलबुल (Grey-headed Bulbul) या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे (ratnagiri district). राजापूर तालुक्यात पक्षीनिरीक्षक श्रीकृष्ण मगदूम यांना या पक्ष्याचे दर्शन घडले (ratnagiri district). या नोंदीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात नोंद झालेल्या पक्ष्यांची संख्येत भर पडली आहे. (ratnagiri district)
रत्नागिरी जिल्ह्यातून आजवर ३६६ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. ज्यामध्ये आता राखी डोक्याच्या बुलबुल पक्ष्याची भर पडली आहे. हा पक्षी जगात केवळ पश्चिम घाटात आढळत असून आजवर त्याची नोंद महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून गोवा, कर्नाटक आणि केरळपर्यंत प्रदेशात होती. मात्र, आता राजापूर तालुक्यात या पक्ष्याचे दर्शन घडल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील या पक्ष्याची पहिलीच नोंद समोर आली आहे. या पक्ष्याच्या शरीराचा रंग प्रामुख्याने हिरवट ऑलिव्ह असतो. डोके, मानेचा मागील भाग आणि गळा राखाडी रंगाचे असतात. कपाळावर पिवळसर हिरवी छटा दिसते. डोळ्यांचा रंग फिकट निळसर पांढरा असून चोच करड्या-हिरव्या रंगाची असते. त्याच्या डोक्यावरील राखाडी रंगामुळे त्याला राखी डोक्याचा बुलबुल हे नाव मिळाले आहे.
हा प्रामुख्याने जंगलातील दाट झाडाझुडपांमध्ये वावरणारा पक्षी आहे. त्याच्या आहारात विविध प्रकारची जंगली फळे, बेरी आणि लहान कीटकांचा समावेश होतो. सदाहरित जंगलांमधील बांबूची बेटे, दाट झुडपे आणि फळझाडे त्याच्या अधिवासासाठी महत्त्वाची आहेत. प्रजननाचा काळ साधारणपणे मार्च ते जुलै या कालावधीत असतो. हा स्थलांतरित पक्षी नसून पश्चिम घाटात आढळणारा स्थानिक निवासी पक्षी आहे. या पक्ष्याच्या मर्यादित भौगोलिक अधिवास आणि जंगलांवरील अवलंबित्व यामुळे त्याच्या अधिवासाचे संवर्धन महत्त्वाचे ठरते. 'स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स २०२५' च्या माहितीनुसार, या पक्ष्याचा जागतिक स्तरावरील संवर्धन दर्जा 'लीस्ट कन्सर्न' (Least Concern) असून, भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाच्या अनुसूची दोनमध्ये त्याचा समावेश आहे.