मेळघाटच्या जंगलात दुर्मीळ ‘स्पॉट-बेलिड ईगल आउल’चे प्रथमच दर्शन!

    12-Nov-2026
melghat tiger reserve
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मेळघाटच्या जंगलातील समृद्ध जैवविविधतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे (melghat tiger reserve). मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह परिसरात दुर्मीळ अशा ‘स्पॉट-बेलिड ईगल आउल’ (Spot-bellied Eagle-Owl) या घुबडाचे प्रथमच दर्शन घडले आहे (melghat tiger reserve). विदर्भात यापूर्वी या घुबडाची नोंद केवळ पेंचच्या जंगलातून झाली होती. त्यामुळे मेळघाटातील ही नोंद विदर्भासाठी विशेष महत्त्वाची मानली जात आहे (melghat tiger reserve). स्थानिक निसर्ग मार्गदर्शकांनी उडणाऱ्या खारीची शिकार केल्यानंतर या घुबडाचे छायाचित्र टिपले. (melghat tiger reserve)
 
मेळघाटच्या जंगलात वाघ, बिबट्या, अस्वल यांसारख्या मोठ्या वन्यप्राण्यांबरोबरच पक्ष्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजातींचाही अधिवास आहे. मेळघाट परिसरात स्थानिक आणि स्थलांतरित मिळून घुबडांच्या १३ प्रजाती आढळतात. त्यामध्ये आता स्पॉट-बेलिड ईगल आउल या नव्या प्रजातीची भर पडली आहे. आकाराने मोठे असलेले हे घुबड डोक्यावरील ठळक पिसांचा तुरा, पिवळी चोच आणि पोटावरील वैशिष्ट्यपूर्ण ठिपक्यांमुळे सहज ओळखता येते. त्याच्या शरीरावरील ठिपक्यांवरूनच त्याला स्पॉट-बेलिड हे नाव मिळाले आहे. प्रामुख्याने दाट सदाहरित आणि आर्द्र पानझडी जंगलांमध्ये अधिवास असलेले हे घुबड निशाचर शिकारी आहे. साप, सरडे, पक्षी तसेच लहान-मोठ्या सस्तन प्राण्यांची शिकार करण्याची त्याची क्षमता आहे.
 
मेळघाटातील सेमाडोह परिसरात उडणाऱ्या खारींची संख्या चांगली आहे. याच भागात एका उडणाऱ्या खारीची शिकार केल्यानंतर हे घुबड स्थानिक निसर्ग मार्गदर्शकांच्या नजरेस पडले. व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग मार्गदर्शक भोला बाबू मावस्कर, अविनाश एच. मसराम, अशोक मावस्कर आणि अक्षय मावस्कर यांनी या घुबडाचे छायाचित्र टिपले. सुरुवातीला हे घुबड तपकिरी वन घुबड असल्याचा त्यांचा समज झाला. मात्र, छायाचित्रांचे निरीक्षण केल्यानंतर त्याचे वेगळेपण लक्षात आले आणि ते स्पॉट-बेलिड ईगल आउल असल्याचे स्पष्ट झाले.






संबंधित मजकूर