बॉक्स ऑफिसवर रामायणाचा जयघोष; सहा दिवसांत ८०० कोटींचा टप्पा पार!

    11-Nov-2026
 
yash
 
 मुंबई - Ramayana Ranbir Kapoor Yashभारतीय महाकाव्य रामायणावर आधारित बहुचर्चित ‘रामायणम् : पार्ट १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत जगभरात ८२३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, भारतातील नेट कलेक्शननेही ४४० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. भव्य निर्मिती, अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्स आणि भारतीय महाकाव्याची जागतिक स्तरावर मांडणी यामुळे चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीपासूनच मोठी चर्चा होती.चित्रपटाने सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ९४.१० कोटी रुपयांचे भारतातील नेट कलेक्शन केले. यासह भारतातील एकूण नेट कमाई ४४०.४५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारतातील ग्रॉस कलेक्शन ५२६.५० कोटी रुपये झाले आहे. तर परदेशातील कमाई २९७ कोटी रुपये असून जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन ८२३.५० कोटी रुपये झाले आहे.
सहाव्या दिवसाच्या कमाईत हिंदी भाषेतील आवृत्तीने आघाडी घेतली. हिंदी आवृत्तीने ७६ कोटी रुपयांची कमाई केली. तर कन्नड आवृत्तीने ७.७५ कोटी, तेलुगूने ४ कोटी, तमिळने ३.६० कोटी आणि मल्याळम आवृत्तीने २.७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.Ramayana Ranbir Kapoor Yash

संबंधित मजकूर