काशीत मुस्लिम महिलांकडून प्रभू श्रीरामांची महाआरती; हनुमान चालीसाचेही केले पठण

    11-Nov-2026   

Muslim Women Perform Shri Ram Aarti in Kashi
 
मुंबई (Muslim Women Perform Shri Ram Aarti in Kashi) : विशाल भारत संस्थान आणि मुस्लिम महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीनिमित्त काशीच्या लमही येथील सुभाष भवनमध्ये मुस्लिम महिलांच्या श्रीराम महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभू श्रीरामांच्या अयोध्येत पुनरागमनावेळी ज्या पद्धतीने अयोध्यानगरी सजली असेल आणि नागरिकांनी त्यांची आरती केली असेल, त्याच भावनेतून शेकडो मुस्लिम महिला सुभाष भवनमध्ये एकत्र आल्या. त्यांनी सजवलेल्या ताटांमध्ये दिवे प्रज्वलित करून भगवान श्रीराम आणि माता जानकी यांची आरती केली. मुस्लिम महिलांनी उर्दूमध्ये लिहिलेली श्रीराम आरती गायली, तसेच हनुमान चालीसाचे पठणही केले.
 
एकता, प्रेम आणि सद्भावनेचे प्रतीक ठरलेल्या सुभाष भवनमध्ये मुस्लिम महिलांनी धार्मिक द्वेष बाजूला ठेवून भारताच्या महान संस्कृतीचा स्वीकार केला. धर्मांतरामुळे पूर्वज, परंपरा आणि रीतिरिवाज बदलत नाहीत, असा संदेश त्यांनी या उपक्रमातून दिला. यावेळी मुस्लिम महिला देशातील नागरिकांना एकत्र जोडण्याचे काम करत असल्याचे सांगण्यात आले. आज जगभरातील कुटुंबे विस्कळीत होत आहेत, कारण लोक श्रीरामांनी दाखवलेल्या मार्गापासून भरकटले आहेत. आज श्रीरामांची संस्कृती आणि त्याग आत्मसात करण्याची गरज आहे. मुस्लिमांनीही श्रीरामांच्या मार्गावर चालून आपल्या मुलांना त्यांच्या त्यागाची ओळख करून दिली, तरच जगात शांतता प्रस्थापित होऊ शकते. प्रत्येकाने आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीचा सन्मान केला पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.(Muslim Women Perform Shri Ram Aarti in Kashi)
 
मुस्लिम महिला फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नाजनीन अन्सारी म्हणाल्या की, भारतभूमीवर राहणारा प्रत्येक व्यक्ती आज कोणत्याही धर्माचे पालन करत असला, तरी आपल्या सर्वांचे पूर्वज भगवान श्रीरामच आहेत. धर्म बदलत राहिले, पण पूर्वज कसे बदलणार? आपल्या पूर्वजांच्या परंपरांपासून वेगळे होऊन आम्हाला कधीही आपली ओळख गमवायची नाही. जे लोक अरब, तुर्की किंवा इराणी बनण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना ना अरब देशांमध्ये, ना तुर्कस्तानमध्ये आणि ना भारतात स्वीकारले जाईल. ते कुठलेच राहणार नाहीत. त्यामुळे आपली खरी ओळख, संस्कृती आणि परंपरा जपत जीवन जगले पाहिजे. धर्म बदलल्याने कोणी अरब किंवा तुर्की कसे होऊ शकते? आता सर्वांसमोर श्रीरामांच्या शरणी जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही. कुटुंबातील त्यागाची भावना श्रीरामांकडून शिकली पाहिजे आणि देशासाठी समर्पण हीच रामराज्याची पायाभरणी आहे, असे त्या म्हणाल्या.(Muslim Women Perform Shri Ram Aarti in Kashi)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर