लग्नाचे आमिष दाखवून हिंदू तरुणीचे धर्मांतर; फैज खानविरोधात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा अंतर्गत गुन्हा दाखल!

    11-Nov-2026   
 
 
Mumbai Conversion Case
 
मुंबई (Mumbai Conversion Case) : लग्नाचे खोटे आमिष दाखवून आणि आर्थिक प्रलोभने देत एका हिंदू तरुणीला तिच्या धर्मापासून परावृत्त करून बळजबरीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धर्मांध जिहादी मोहम्मद फैज ऊर्फ फैज अकबर खान असे आरोपीचे नाव असून जोगेश्वरीच्या मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये पीडित तरुणी ती मोबाईलवर फैज खान याच्याशी बोलत असल्याचे वडिलांना समजले होते. त्यानंतर तिला समज देऊन तो विषय थांबवण्यात आला होता. मात्र, वडिलांच्या निधनानंतर फैज खान याने पुन्हा पीडित तरुणीशी जवळीक साधली. तिला लग्नाचे आमिष दाखवले. या त्रासाला कंटाळून तरुणीच्या आईला आपल्या मुलांसह जोगेश्वरी येथून विरारला स्थलांतर करावे लागले. मात्र तिथेही तो जिहादी तरुणीच्या संपर्कात राहिला. एवढेच नव्हे तर, "तू जर मुस्लिम धर्म स्वीकारला, तरच मी तुझ्याशी लग्न करेन," असे म्हणून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. (Mumbai Conversion Case)
 
दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पीडित तरुणी कामाचा स्वरूप असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली ती परतलीच नाही. मुलीचा फोन लागला नाही आणि ती घरी आली नाही, तेव्हा तिच्या आईने विरार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात मुलगी पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी तरुणीने तिच्या आईला वांद्र्यात कोर्ट मॅरेज केल्याचे प्रमाणपत्र मोबाईलवर पाठवले. पोलिसांनी तपासणीसाठी बोलावल्यावर तरुणीने आपण स्वेच्छेने विवाह केल्याचे व गोरेगाव येथे राहत असल्याचे सांगितले. (Mumbai Conversion Case)
 
दि. २४ ऑक्टोबर रोजी फैज खान याने तरुणीच्या भावाच्या मोबाईलवर त्यांच्या होणाऱ्या लग्नाची छापील पत्रिका पाठवली. त्या पत्रिकेवर 'मोहम्मद फैज वेड्स श्रावणी (आयेशा)' असे नाव छापण्यात आले होते, तसेच येत्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजी जोगेश्वरी पूर्वेकडील अमिना नगर येथे विवाह ठरल्याचे नमूद होते. या संपूर्ण घटनाक्रमानंतर, फसवणूक करून आणि लग्नाचे आमिष दाखवून मुलीचे बेकायदेशीर धर्मांतर केल्याची पालकांची खात्री पटली. तरुणीच्या आईने मेघवाडी पोलीस स्थानकात सदर प्रकरणी तक्रार नोंदवली असून आरोपी विरोधात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ च्या कलम ९(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी जोर धरताना दिसते आहे. (Mumbai Conversion Case)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर