म्हाडाच्या घरांवर ‘लँड जिहाद’; अँटॉप हिलमधील ११० सदनिकांवर बांगलादेशी घुसखोरांचा ताबा!

    11-Nov-2026   
 
 
Kirit Somaiya MHADA Flats Allegation
 
मुंबई (Kirit Somaiya MHADA Flats Allegation) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातात. मात्र, या योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरांवरच ‘लँड जिहाद’ सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी केला. मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील ११० सदनिकांवर बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांनी ताबा मिळवल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सदनिकांसाठी अर्ज हिंदू नागरिकांच्या नावाने करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात या घरांचे लाभार्थी बांगलादेशी घुसखोर असून, त्यांनी संबंधित घरांचा ताबा मुखत्यारपत्राच्या (पॉवर ऑफ अटर्नी) माध्यमातून मिळवला आहे. या प्रकरणासंदर्भात आपण कागदोपत्री पुराव्यांसह म्हाडा आणि संबंधित मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली असून, सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केल्याचे सोमय्या यांनी सांगितले. (Kirit Somaiya MHADA Flats Allegation)
 
हिंदू नागरिकांच्या नावाने मंजूर झालेल्या सदनिकांवर अन्य व्यक्तींनी ताबा मिळवल्याची अनेक उदाहरणेही सोमय्या यांनी समोर आणली आहेत. अविनाश रविधोने यांच्या नावावर मंजूर झालेल्या सदनिकेत मन्सुरी जुनेद मोहम्मद याने वास्तव्य सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचप्रमाणे रमेश घाटाळ, श्याम रौतेकर, मनोज खांबे, श्याम गायकवाड, निर्मला बर्वे, विनायक कुंभार, देविदास माने, कन्हैयाप्रसाद, इंदुबाई पवार आणि बाळू कडू यांच्या नावावर असलेल्या सदनिकांवरही अनुक्रमे शकील अहमद सिद्दिकी, नसरीन रमजान शेख, मुनीरा रिझवान, रिझवान मोहम्मद हुसेन, साजिद अली कादिर अब्दुल बाते, मुजम्मिल शेख, अन्सारी हाफिजूर, मोहम्मद जहांगीर शेख, मोहम्मद सिद्दिकी शेख आणि खान सद्दाम हुसेन यांनी ताबा मिळवल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Kirit Somaiya MHADA Flats Allegation)
 
सोमय्या यांनी या प्रकरणासंदर्भातील अधिकृत तक्रारीची प्रतही प्रसिद्ध केली आहे. या तक्रारीनुसार, मुलुंड पूर्व येथील नीलम नगरमधील त्यांच्या कार्यालयात नूरबाजार परिसरातील म्हाडाच्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाच्या वसाहतीतील ५० हून अधिक रहिवाशांनी भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. अतिक्रमण, मारहाण, बेकायदा घुसखोरी, कथित लँड जिहाद, बेनामी व्यवहार आणि गुंडगिरी यांमुळे रहिवासी प्रचंड त्रस्त असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. (Kirit Somaiya MHADA Flats Allegation)
 
म्हाडाच्या भ्रष्ट अधिकारी आणि दलालांनी बांगलादेशी घुसखोर तसेच काही मुस्लिम व्यक्तींशी संगनमत करून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी असलेल्या सरकारी गृहनिर्माण योजनेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. या प्रकरणाची म्हाडाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. येत्या शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी आपण प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Kirit Somaiya MHADA Flats Allegation)
 
या प्रकरणात लॉटरी प्रक्रियेनंतर बेनामी किंवा अनधिकृत लाभार्थ्यांकडे सदनिकांचे हस्तांतरण, मोठ्या प्रमाणावर जमिनीवर अतिक्रमण आणि ‘लँड जिहाद’सदृश प्रकार सुरू असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. स्वप्नपूर्ती सोसायटीतील ४१ सदनिकांमध्ये मूळ पात्र लाभार्थ्यांऐवजी बांगलादेशी मुस्लिम घुसखोर राहत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच, जवळच्या बंगालीपुरा परिसरात अशा घटकांची उपस्थिती वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घुसखोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. (Kirit Somaiya MHADA Flats Allegation)
 
मुखत्यारपत्रधारक आणि बेनामी लाभार्थ्यांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार सुरू असून, त्याला म्हाडातील काही अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांच्या समर्थनार्थ सोमय्या यांनी संबंधित व्यक्तींची यादी आणि कागदपत्रे जोडली आहेत. तसेच, प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी म्हाडाचे संबंधित अधिकारी, महापालिका प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित राहावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Kirit Somaiya MHADA Flats Allegation)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर