‘बंधू’ने चित्रपताका महोत्सवाचे उद्घाटन; ‘गोंधळ’ सिनेमाच्या प्रदर्शनाने होणार समारोप!

    11-Nov-2026
 
Chitrapataka Marathi Film Festival 2026
 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण आशय, सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्तीचा उत्सव असलेल्या ‘चित्रपताका – २०२६’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अभिनेते उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बंधू’ने ‘चित्रपताका’ महोत्सवाचे उद्घाटन, तर १८ नोव्हेंबरला ‘गोंधळ’ या भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका मिळालेल्या सिनेमाच्या प्रदर्शनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. Chitrapataka Marathi Film Festival 2026 Bandhu Gondhal
 
याशिवाय अन्य नवीन, आशयघन २८ मराठी सिनेमे आणि ‘सांगते ऐका’, ‘पिंजरा’, ‘उंबरठा’ हे जुने अभिजात मराठी चित्रपट, तसेच विविध विषयांवरील चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा अशा उपक्रमांचाही महोत्सवात समावेश आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आशयवैविध्य आणि कलात्मक सामर्थ्याचा उत्सव ठरणाऱ्या या महोत्सवात सहभागी होण्यासाठी महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावरू नावनोंदणी करावी. चार दिवसांच्या महोत्सवासाठी नाममात्र १०० रुपये शुल्क असून नोंदणी शुल्कातून जमा होणारा महसूल दुष्काळ निवारण कार्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केला जाणार आहे. कलेचा आनंद देणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासणाऱ्या या महोत्सवाची प्रेक्षकनोंदणी सुरू असून अधिकाधिक सिनेरसिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे.Chitrapataka Marathi Film Festival 2026 Bandhu Gondhal
 
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या चार दिवसीय महोत्सवात मराठी चित्रपटांचे वैविध्यपूर्ण विषय, आशयघन कथा आणि चित्रपट माध्यमातील विविध प्रयोग रसिकांना अनुभवता येणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात संपन्न होणाऱ्या या चार दिवसीय महोत्सवात तब्बल ३३ आशयघन सिनेमे, जवळपास २० सिनेमाविषयक संवादसत्रे आणि उपक्रमाची पर्वणी सिनेरसिकांना अनुभवता येणार आहे.Chitrapataka Marathi Film Festival 2026 Bandhu Gondhal




संबंधित मजकूर