कल्याण डोंबिवली मधील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आक्रमक...

    09-Oct-2026
   
 
Kalyan Dombivli railway issues
 
ठाणे (Kalyan Dombivli railway issues): कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण 'अ‍ॅक्शन मोड'वर आले आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात रवींद्र चव्हाण यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे प्रबंधक (DRM) हिरेश मीना यांच्यासोबत एक उच्चस्तरीय आणि महत्त्वपूर्ण बैठक घेतली. शनिवार, २६ सप्टेंबर रोजी रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन आपल्या गंभीर समस्या मांडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या मागण्यांची तातडीने दखल घेत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. (Kalyan Dombivli railway issues)
 
कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढती लोकसंख्या, अपुऱ्या लोकल फेऱ्या आणि प्रवासासाठी करावी लागणारी कसरत यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. सकाळी कामावर जाण्याच्या आणि सायंकाळी घरी परतण्याच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी डोंबिवली, दिवा आणि निळजे स्थानकांतून मुंबईच्या दिशेने थेट लोकल सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या प्रश्नांसह प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले. (Kalyan Dombivli railway issues)
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गर्दीच्या वेळेत निळजे स्थानकातून मुंबईकडे दर तासाला लोकल सुरू करणे, तसेच डोंबिवली आणि दिवा स्थानकांतून थेट मुंबईसाठी लोकल फेऱ्या उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. लोकलमधील गर्दीचे नियोजन, प्रवाशांची सुरक्षा आणि विलंबाने धावणाऱ्या गाड्यांचा प्रश्नही बैठकीत मांडण्यात आला. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी चव्हाण यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. (Kalyan Dombivli railway issues)
 
डोंबिवली-दिव्यातील गर्दीचा प्रश्न कायम
 
डोंबिवली आणि दिवा ही स्थानके मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नोकरदारांसाठी महत्त्वाची केंद्रे आहेत. गर्दीच्या वेळेत या स्थानकांवर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. लोकलमध्ये चढण्यासाठी होणारी धडपड, फलाटांवरील गर्दी आणि गाड्यांना होणारा विलंब यामुळे प्रवासाचा ताण वाढतो. (Kalyan Dombivli railway issues)
 
या पार्श्वभूमीवर डोंबिवली आणि दिवा येथून थेट मुंबईकडे अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. केवळ गाड्यांची संख्या वाढविण्याबरोबरच वेळापत्रक अधिक परिणामकारक करणे, गर्दीच्या वेळेतील प्रवासीभाराचे नियोजन आणि फलाटांवरील सुरक्षितता यांवरही लक्ष देण्याची गरज असल्याच प्रवासी संघटनांच म्हणणं आहे. (Kalyan Dombivli railway issues)
 
निळजे स्थानकावरील प्रवाशांना दिलासा कधी?
 
डोंबिवलीच्या पुढील परिसरात विकसित झालेल्या निवासी संकुलांमुळे निळजे आणि लोढा पलावा परिसरातून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांची गरज वाढली आहे. मात्र, स्थानिक रेल्वे सेवेची उपलब्धता आणि प्रवाशांच्या अपेक्षा यांतील अंतर हा या भागातील महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे निळजे स्थानकातून गर्दीच्या वेळेत दर तासाला मुंबईकडे लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Kalyan Dombivli railway issues)
 
ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी अधिक सोयीचा पर्याय मिळू शकतो. मात्र, या मागणीची अंमलबजावणी करताना उपलब्ध रेल्वे मार्ग, गाड्यांचे वेळापत्रक, मार्गावरील वाहतुकीची क्षमता आणि अन्य सेवांशी समन्वय यांचा विचार करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासन या मागणीवर कोणता निर्णय घेते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. (Kalyan Dombivli railway issues)
 
४८ प्रवासी संघटनांनी मांडले प्रश्न
 
प्रवासी संघटनांनी कळवा-ऐरोली रेल्वे लिंकचे काम वेगाने पूर्ण करणे, बदलापूर-कर्जत आणि कल्याण-कसारा मार्गावरील तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकांच्या कामाला गती देणे, ठाणे-कर्जत आणि ठाणे-कसारा दरम्यान विशेष शटल सेवा सुरू करणे, तसेच आधुनिक सिग्नल यंत्रणेद्वारे लोकल गाड्यांमधील अंतर कमी करून फेऱ्यांची क्षमता वाढविण्याची मागणी केली आहे. 
 
या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी २६ सप्टेंबर रोजी मुंबई आणि ठाणे परिसरातील ४८ रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली जिमखाना येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत रविंद्र चव्हाण यांच्यातर्फे या सर्वच प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
 
याशिवाय दिवा-वसई-पनवेल मार्गावरील थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविणे आणि कल्याण जंक्शनसह मुंबईकडील रेल्वे पायाभूत सुविधांची क्षमता वाढविण्याचा मुद्दाही चर्चे दरम्यान मांडण्यात आला आहे. (Kalyan Dombivli railway issues)
 
 
 




संबंधित मजकूर