पोटनिवडणुकीत प. बंगालमध्येभाजपची सरशी, टीव्हीकेची बाजी

    09-Oct-2026
 

West Bengal bypoll results 2026
 
 
नवी दिल्ली,(West Bengal bypoll results 2026) : देशातील चार राज्यांतील पाच विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधील एका लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये मोठे यश मिळविले आहे. नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळविला. आसाममधील नागाव लोकसभा मतदारसंघातही भाजपचे देवाशिष शर्मा विजयी झाले. दुसरीकडे, तमिळनाडूमध्ये अभिनेता आणि मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या तमिळगा व्हेट्री कळगम अर्थात टीव्हीके पक्षाने धारापुरम आणि मदुरंतकम या दोन्ही जागांवर विजय मिळविला. पुदुच्चेरीतील थट्टांचावडी मतदारसंघात ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसचे अशोक आनंद यांनी बाजी मारली.(West Bengal bypoll results 2026)
 
पश्चिम बंगालमध्ये नंदीग्रामची निवडणूक विशेष चर्चेत होती. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ही जागा सोडल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या हसीराणी रथ यांनी काँग्रेसचे मिलन प्रधान यांचा सुमारे १.२२ लाख मतांच्या फरकाने पराभव केला. रेजीनगरमध्ये भाजपचे शंकरव सरकार यांनी आम जनता उन्नयन पक्षाचे उमेदवार गुलाम नबी आझाद यांचा ७५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. अल्पसंख्याकबहुल रेजीनगरमधील विजय भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.(West Bengal bypoll results 2026)
 
आसाममधील नागाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे देवाशिष शर्मा यांनी काँग्रेस आणि एआययूडीएफच्या उमेदवारांना मात दिली.यापूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. त्यामुळे या निकालामुळे काँग्रेसला धक्का बसल्याचे चित्र आहे.(West Bengal bypoll results 2026)
 
तमिळनाडूमध्ये टीव्हीकेने धारापुरम आणि मदुरंतकम या मतदारसंघांतील पोटनिवडणुकांत यश मिळवले. मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांच्या पक्षासाठी ही पहिली महत्त्वाची पोटनिवडणूक मानली जात होती. पुदुच्चेरीतील थट्टांचावडीमध्ये सत्ताधारी ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसचे अशोक आनंद यांनी काँग्रेसचे ई. विनायगम यांचा आठ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.(West Bengal bypoll results 2026)
 
 




संबंधित मजकूर