नाना पाटेकरांच्या निधनाच्या बातमीवर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया, ८ वर्षांपूर्वी केले होते गंभीर आरोप !

    08-Oct-2026
 
tanushri
 
मुंबई - nana patekar Tanushree Dutta दि. ८ ऑक्टोबर हा चित्रपटसृष्टीसाठी खूप कठीण दिवस होता. नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वजण निःशब्द झाले आहेत. नाना एक दमदार, कसलेले अभिनेते होते. जेव्हा कधी ते बोलायचे, तेव्हा सर्वजण लक्ष देऊन ऐकायचे. असेही म्हणता येईल की त्यांचे शब्द इतके प्रभावी होते की ते श्रोत्यांना निःशब्द करून टाकत असत. दुनानांच्या निधनाच्या बातमीने प्रत्येक चाहत्याच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. संपूर्ण देश त्यांच्यासाठी शोक करतोय. बॉलिवूडने आपला कोहिनूर गमावला आहे. पण नानांसोबत जुना वाद असलेल्या तनुश्रीने मात्र इंस्टाग्रामवर पोस्ट करत संपूर्ण मीडिया सध्या 'ईविल डेड'च्या बातम्या देण्यात व्यस्त असल्याचे म्हणत आपली प्रतिक्रिया दिलीये.
 
तनुश्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले, "मी ऐकलं. मी बातमी ऐकली. आज माझ्या कामाचा दिवस आहे. मी एका कार्यक्रमासाठी लखनौला जात आहे...आणि मला फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करायचे आहे. लखनौमध्ये माझा एक मोठा आणि महत्त्वाचा कार्यक्रम आहे. माझा संपूर्ण दिवस नियोजित आहे. मी पोस्ट करेन आणि लाईव्ह येईन.आता मला काळजी वाटते की संपूर्ण मीडिया सध्या 'ईविल डेड'च्या बातम्या देण्यात व्यस्त असेल. म्हणून मी माझी प्रतिक्रिया देईन.काय प्रतिक्रिया द्यावी याचा मी अजूनही विचार करते आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना!nana patekar Tanushree Dutta
 
नाना पाटेकर साधे जीवन जगले, पण ते अनेक वादांमध्येही अडकले होते. २०१८ मध्ये #MeToo चळवळीदरम्यान तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता… २००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान, नानांनी नृत्याच्या स्टेप्स शिकवण्याच्या बहाण्याने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगत ते सातत्याने फेटाळून लावले आहेत. पोलिसांच्या तपासात पुरेसे पुरावे नसल्याचे निष्पन्न झाले होते. तर दुसरीकडे, २०२५ मध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाने नानांविरुद्ध दाखल केलेली तक्रारही फेटाळून लावली.nana patekar Tanushree Dutta




संबंधित मजकूर