नाना पाटेकर यांच्यावर पुणे फार्महाऊसवर अंत्यसंस्कार होणार; मिळणार शासकीय सन्मान!

    08-Oct-2026
Nana Patekar
 
मुंबई - nana patekar ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात अखेरचा श्वास घेतला..गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र याचवेळी नाना पाटेकर यांचा मृत्य झाला. नानांचे निधन गोव्यात झाले, परंतु त्यांचा अंत्यविधी पुण्यातील त्यांच्या फार्महाऊसवर होणार आहे. नानांच्या फाऊंडेशनच्या सीईओने याला दुजोरा दिला आहे.legend
 
ज्या मातीशी नानांची नाळ होती, जिव्हाळ्याचे नाते होते त्याच पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील त्यांच्या 'नानाची वाडी' या फार्म हाऊसवर नाना पाटेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांच्याशी फोनवर संवाद साधून शोक व्यक्त केला. नानांवर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहे.nana patekar
 
नाना शेवटचे 'ओ रोमियो' या चित्रपटात दिसले होते. विशाल भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात नानांसोबत शाहिद कपूर, तृप्ती डिमरी आणि फरिदा जलाल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील नानांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. त्याआधी ते 'हाऊसफुल ५' मध्ये दिसले होते. जिथे त्यांच्या एन्ट्री सीनपासून ते डान्स सीक्वेन्सपर्यंत सगळ्यांवरच चाहत्यांच्या टाळ्या शिट्ट्या पडल्या होत्या.nana patekar




संबंधित मजकूर