राजकुमार यांची १०० वी जयंती आणि नाना पाटेकर यांचे निधन एकाच दिवशी! एकाच सिनेमात स्क्रीन शेअर करणाऱ्या सहकलाकरांसाठी अनोखा योगायोग

    08-Oct-2026
  
 
Nana Patekar Death
 
मुंबई (Nana Patekar Death): ८ ऑक्टोबर हा दिवस चित्रपटसृष्टीतील एक अद्भुत योगायोग ठरला. 'तिरंगा' या बॉलिवूड चित्रपटात एकाच पडद्यावर सहकलाकार म्हणून काम केले आणि राज कुमार यांच्या जन्म दिवशी नाना पाटेकर यांची प्राणज्योत मालवली. (Nana Patekar Death)
 
८ ऑक्टोबर १९२६ रोजी राज कुमार यांचा जन्म झाला होता, बरोबर १०० वर्षांनी, गुरुवार दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी गोव्यात नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.
 
१९९३ मध्ये राज कुमार आणि नाना पाटेकर यांनी तिरंगा या चित्रपटात सोबत काम केले होते. हा चित्रपट मेहुल कुमार यांनी दिग्दर्शित केला असुन यात वर्षा उसगावकर, हरीष कुमार आणि ममता कुलकर्णी यांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांनी काम केले आहे. 
 
गुरूवारी सकाळी पाटेकर यांच्या दुखद निधनाची बातमी आली. वयाच्या ७५ व्या वर्षी पाटेकर यांचे ह्रदयविकाराच्या आजाराने निधन झाले. १०० वर्षापुर्वी याच दिवशी राज कुमार यांचा जन्म झाला होता. (Nana Patekar Death)
 
नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन:
 
'खामोशी' चित्रपटातील अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते त्यांच्या राहत्या घरी बेशुद्ध झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. (Nana Patekar Death)
 
कलाकारांनी व्यक्त केली शोककळा:
 
पाटेकर यांच्या निधनानंतर अक्षय कुमार, राम गोपाल वर्मा, प्रकाश राज, रितेश देशमुख, मनीषा कोईराला, सुनील शेट्टी, अनुपम खेर यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने मित्रपरिवार आणि सहकारी कलाकारांना दु:खद धक्का बसला आहे. (Nana Patekar Death)
 
नाना पाटेकर यांचा शेवटचा चित्रपट:
 
या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या 'ओ'रोमिओ' या चित्रपटात पाटेकर शेवटचे मोठ्या पडद्यावर दिसले होते.
 
दरम्यान, नाना पाटेकर श्रद्धा कपूरच्या 'ईथा' या चित्रपटात दिसणार असल्याच्या बातम्याही पसरल्या आहेत, पण अद्याप खात्री मिळालेली नाही. (Nana Patekar Death)
 
 




संबंधित मजकूर