कृष्णापटणम (Maharashtra Skill Training Centre): महाराष्ट्रातील वाढवण बंदर, मरीन क्लस्टर, दिघी पोर्ट यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ राज्यातच तयार करण्यासाठी आधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. (Maharashtra Skill Training Centre)
आंध्र प्रदेशातील अदानी पोर्ट कृष्णापटनम येथील कार्गो हँडलिंग इक्विपमेंट ट्रेनिंग सिम्युलेटर्स तसेच ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी एक्सलन्स सेंटरला मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन तेथील प्रशिक्षण पद्धती आणि कौशल्यविकासाच्या उपक्रमांची माहिती घेतली. आधुनिक बंदरांसाठी कुशल, सुरक्षित आणि तंत्रज्ञानसज्ज मनुष्यबळ कशा पद्धतीने तयार केले जाते, याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. (Maharashtra Skill Training Centre)
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्रात वाढवण बंदर, मरीन क्लस्टर, दिघी पोर्ट यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून बंदर आणि सागरी क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पांना आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ महाराष्ट्रातील तरुणांमधूनच उपलब्ध व्हावे, यासाठी कृष्णापटनम येथील प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्किल ट्रेनिंग सेंटर उभारणार आहे. (Maharashtra Skill Training Centre)
या प्रशिक्षण केंद्रांसाठी आवश्यक जागा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. महाराष्ट्रात अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला अदानी स्किल सेंटरच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Skill Training Centre)
या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगाभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार असून, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासोबतच बंदर आणि सागरी क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ राज्यातच तयार होईल. विशेषतः कोकणासह राज्यातील किनारपट्टी भागातील तरुणांना स्थानिक पातळीवर कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देत सागरी आणि बंदर क्षेत्रात उत्तम करिअर घडविण्याचा मार्ग खुला होईल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला. (Maharashtra Skill Training Centre)
यावेळी अदानी कृष्णापटनम पोर्ट लिमिटेडचे CEO जगदीश एन. पटेल, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे CEO प्रदीप पी., Chief Port Officer कॅप्टन प्रवीण खरा, Executive Engineer मनीष मेटकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Maharashtra Skill Training Centre)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.