मुंबई - Sayali Sanjeev avinash narkarस्वाभिमान, सत्य आणि न्यायाची लढाई ! कोर्टरूम ड्रामाचा अनोखा मेळ साधणाऱ्या ‘जनक’ या आगामी मराठी चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. दिग्दर्शक अभिषेक कंवर यांच्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमधून रहस्य, संघर्ष आणि न्यायाच्या लढाईची झलक पाहायला मिळते. काही सेकंदांच्या या मोशन पोस्टरमधूनच चित्रपटातील संघर्षाची तीव्रता आणि पुढे उलगडणाऱ्या रहस्याची उत्सुकता निर्माण होते.
आयुष्य बदलणाऱ्या त्या एका घटनेनंतर सुरू झाली अशी लढाई जिथे पणाला लागला आहे एका माणसाचा स्वाभिमान आणि त्याच एका घटनेने उभा केला न्यायाचा प्रश्न ! आर. टी. बी. फिल्म्स निर्मित आणि अभिषेक कंवर दिग्दर्शित या कोर्टरूम ड्रामा मध्ये अविनाश नारकर, सायली संजीव आणि सुरेश विश्वकर्मा हे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. त्याचबरोबर विनिता काळे, अनुष्का पिंपुटकर, ओंकार भसमे, प्रसाद ओझरकर यांच्यासह अनेक नामवंत मराठी कलाकार सिनेमात दिसणार आहेत.Sayali Sanjeev avinash narkar
चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कंवर यांनी केले असून, कथा, पटकथा आणि संवादलेखन ओंकार भसमे यांचे आहे. त्रिलोक सिंग राजपूत असोसिएट प्रोड्युसर, सुजीत मुकाटे कार्यकारी निर्माते असून आदित्य कडताने यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.Sayali Sanjeev avinash narkar
एक स्त्री… एक सत्य… आणि एक लढा या तीन सूत्रांभोवती गुंफलेली ही कथा नेमकं सत्य काय आहे आणि न्यायाच्या या लढाईत कोण जिंकणार ? याची उत्सुकता निर्माण करते.Sayali Sanjeev avinash narkar
अभिषेक कंवर दिग्दर्शित आणि आर टी बी फिल्म्स प्रस्तुत जनक हा थ्रिलर कोर्टरूम ड्रामा नोव्हेंबर २०२६ मध्ये महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.Sayali Sanjeev avinash narkar