
मुंबई - sanju rathod Isha Malviya Gurmeet Choudharyहिटमेकर संजू राठोड पुन्हा एकदा आपल्या नव्या ‘नखरे’ या धमाकेदार मराठी गाण्यासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आपल्या खास आवाजाची शैली, उत्साही बीट आणि सहज लक्षात राहणाऱ्या हुकस्टेपसह हे गाणं प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडणारं आहे. गुरमीत चौधरी आणि ईशा मालवीय यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात धमाल, एनर्जेटिक आणि एंटरटेनिंग अंदाज पाहायला मिळतो.
विशेष म्हणजे, संजू राठोड आणि ईशा मालवीय ही जोडी पुन्हा एकदा एका मराठी गाण्यासाठी एकत्र आली आहे. संजूचा दमदार आवाज आणि गाण्याचा भन्नाट बीट ‘नखरे’ला एक वेगळीच ओळख देतो. त्यातच गाण्याची आकर्षक हुकस्टेप त्याच्या डान्सिंग आणि मजेशीर अंदाजात आणखी भर घालते.sanju rathod Isha Malviya Gurmeet Choudhary
गुरमीत चौधरी आणि ईशा मालवीय यांनी आपल्या उत्साही परफॉर्मन्सने ‘नखरे’ला चार चाँद लावले आहेत. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि भन्नाट हुकस्टेप गाण्याची एनर्जी आणखी वाढवते.sanju rathod Isha Malviya Gurmeet Choudhary
‘नखरे’ हे ‘तुम मेरे हो’ या चित्रपटाचा एक भाग असून, या गाण्यात संगीताला एक फ्रेश मराठी फ्लेवर मिळाला आहे. हे गाणं आता स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.sanju rathod Isha Malviya Gurmeet Choudhary
गाण्याबद्दल बोलताना संजू राठोड म्हणाला,“‘नखरे’ हे गाणं करताना खूप मजा आली. माझ्या खास मराठी अंदाजाला या गाण्यात आणण्याचा आणि अशा भन्नाट बीट असलेल्या गाण्यावर काम करण्याचा अनुभव खूप छान होता. हुकस्टेपमुळे गाण्याची मजा आणखी वाढली आहे आणि गाणं ज्या पद्धतीने तयार झालं आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. प्रेक्षकांनाही हे गाणं नक्की आवडेल अशी मला आशा आहे.”sanju rathod Isha Malviya Gurmeet Choudhary
यावेळी गुरमीत चौधरी म्हणाला,“‘नखरे’ची एनर्जी खूप वेगळी आहे आणि या गाण्याचं शूटिंग करताना आम्ही खूप एन्जॉय केलं. संजूने आपल्या खास मराठी शैलीचा सुंदर अंदाज या गाण्यात आणला आहे, त्यामुळे गाण्याला एक फ्रेश फील मिळतो. ईशा आणि मला या गाण्याचं शूटिंग करताना, विशेषतः हुकस्टेप करताना खूप मजा आली. प्रेक्षकांनी हे गाणं पाहावं यासाठी मी खूप उत्सुक आहे.”sanju rathod Isha Malviya Gurmeet Choudhary
ईशा मालवीय म्हणाली,“‘नखरे’मध्ये खूपच मजेशीर आणि युथफुल व्हाइब आहे. या गाण्यासाठी संजूसोबत पुन्हा एकदा काम करणं माझ्यासाठी खूप खास होतं. गाण्याचा मराठी अंदाज मला खूप आवडला. गुरमीत आणि मला या गाण्याचं शूटिंग करताना, विशेषतः हुकस्टेप करताना खूप मजा आली. हे गाणं आता प्रेक्षकांसमोर आलं आहे याचा मला खूप आनंद आहे आणि त्यांनी या गाण्याचा नक्की आनंद घ्यावा.”sanju rathod Isha Malviya Gurmeet Choudhary
‘नखरे’ हे गाणं संजू राठोडने गायले असून, यात गुरमीत चौधरी आणि ईशा मालवीय झळकत आहेत. हे गाणं आता स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. तर ‘तुम मेरे हो’ हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.sanju rathod Isha Malviya Gurmeet Choudhary