एका पिढीसाठी अरुण गोविल यांनी साकारला होता प्रभू राम; आता ‘रामायण’च्या विश्वात राजा दशरथांची भूमिका साकारणार !

    07-Oct-2026

ramayan
 
 
 
 मुंबई - Ramayana Arun Govilरामायण’च्या निर्मात्यांनी अरुण गोविल यांचे राजा दशरथच्या भूमिकेतील खास सोलो पोस्टर प्रदर्शित केले आहे. प्रभू रामांच्या अजरामर भूमिकेसाठी आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान असलेल्या अरुण गोविल यांच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा नवा अध्याय ठरणार आहे.
नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये अरुण गोविल राजा दशरथ यांच्या भूमिकेत दिसत आहेत. प्रभू रामांचे पिता आणि अयोध्येचे पराक्रमी राजा दशरथ यांच्या भूमिकेतील त्यांची ही पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अरुण गोविल यांनी यापूर्वी प्रभू रामांची भूमिका साकारून ती अनेक पिढ्यांच्या भारतीय प्रेक्षकांच्या मनात अजरामर केली आहे. त्यामुळे त्यांचा ‘रामायण’च्या या नव्या भूमिकेतील प्रवेश विशेष ठरत आहे.Ramayana Arun Govil
प्रभू रामांच्या भूमिकेसाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेले आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अरुण गोविल आता अयोध्येचे राजा आणि प्रभू रामांचे पिता दशरथ यांची भूमिका साकारत आहेत. ‘रामायण’शी अरुण गोविल यांचे असलेले खास नाते त्यांच्या या नव्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे आणखी दृढ झाले आहे.Ramayana Arun Govil
निर्मात्यांनी सोशल मीडियावर हे नवे पोस्टर प्रदर्शित करत कॅप्शनमध्ये लिहिले, “एका पिढीसाठी त्यांनी रामाला जिवंत केले. आता ते ‘रामायण’च्या विश्वात अयोध्येचा राजा म्हणून परतले आहेत. राजा दशरथच्या भूमिकेत अरुण गोविल. 👑”Ramayana Arun Govil
या पोस्टरमध्ये अरुण गोविल राजा दशरथ यांच्या राजेशाही अवतारात दिसत आहेत. त्यांच्या लूकमधील बारकावे अयोध्येच्या राजाची भव्यता, प्रतिष्ठा आणि अधिकार अधोरेखित करतात. अरुण गोविल यांना प्रभू रामाच्या भूमिकेत पाहत मोठ्या झालेल्या प्रेक्षकांसाठी हा बदल नक्कीच खास आहे, कारण आता ते ज्या व्यक्तिरेखेला त्यांनी अजरामर केले, त्याच रामाचे पिता असलेल्या दशरथांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.Ramayana Arun Govil
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर प्रभू राम, साई पल्लवी सीता, रॉकिंग स्टार यश रावण, सनी देओल हनुमान आणि रवी दुबे लक्ष्मण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.Ramayana Arun Govil



नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजच्या निर्मितीखाली, ८ वेळा ऑस्कर विजेत्या DNEG आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने ‘रामायण’ची निर्मिती करण्यात येत आहे. हा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणारा भव्य महाकाव्यात्मक चित्रपट आहे. ‘रामायण’चा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होईल. हा चित्रपट भारतात हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.Ramayana Arun Govil
‘रामायण’ IMAXमध्ये प्रदर्शित होणार असून, भारत वगळता जगभरातील वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्सकडे आहे, तर हिंदी भाषिक बाजारपेठेसाठी धर्मा प्रॉडक्शन्स वितरक म्हणून काम करणार आहे.Ramayana Arun Govil
 




संबंधित मजकूर