
मुंबई - Rajinikanth Jailer 2दिग्गज अभिनेता रजनीकांत त्यांच्या 'जेलर २' या चित्रपटाचा प्रचार केवळ मुलाखतींच्या माध्यमातून करणार आहेत. ते ११ ऑक्टोबर रोजी तीन तास प्रेक्षकांशी संवाद साधून चित्रपटाचा प्रचार करतील. गेल्या काही काळापासून, भव्य बजेटचे दाक्षिणात्य चित्रपट ऑडिओ लाँचच्या माध्यमातून स्वतःचा प्रचार करत आहेत. रजनीकांतच्या चाहत्यांना त्याच्या आगामी 'जेलर 2' या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून ऑडिओ लाँच कार्यक्रमाची अपेक्षा होती, पण या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून रजनीकांत प्रमोशनची आगळीवेगळी स्टाईल वापरणार आहेत.
'जेलर2'च्या निर्मात्यांनी एका साध्या अल्बम प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहे, जिथे रजनीकांत एका मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधतील. ही तीन तासांची मुलाखत सन टीव्हीवर प्राइम टाइममध्ये प्रसारित होईल. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलाखत ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६:३० ते रात्री ९:३० या वेळेत प्रसारित होईल.Rajinikanth Jailer 2
याआधी रजनीकांतच्या बहुतेक चित्रपटांचे प्रमोशन भव्य ऑडिओ लाँच कार्यक्रमांमधून केले जात असे. चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींची भाषणे, किस्से आणि संगीतकार अनिरुद्धचे थेट सादरीकरण अनेकदा चर्चेत असे. मात्र, 'जेलर २' ने हा प्रचलित प्रकारच बदलून टाकला आहे. कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत भव्य ऑडिओ लाँच आयोजित करण्याऐवजी, निर्मात्यांनी एका खाजगी कार्यक्रमाद्वारे अल्बम लाँच करण्याचे निवडले. 15 ऑक्टोबर सुपरस्टार रजनीकांत यांचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.Rajinikanth Jailer 2